अखेर डेक्कन क्वीन एक्स्प्रेस महिला कर्मचा-यांसह रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 5:02am

महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी डेक्कन क्वीनची धुरा सांभाळली.

मुंबई - महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी डेक्कन क्वीनची धुरा सांभाळली. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संपूर्ण महिला कर्मचा-यांसह मध्य रेल्वेवर डेक्कन क्वीन धावली. मालगाडी, लोकल यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाºया सुरेखा यादव यांच्याकडे एक्स्प्रेसची धुरा सोपवण्यात आली. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, अशा शुभेच्छा देण्यासाठी स्थानकात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एक्स्प्रेसला रवाना करण्यासाठी मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली होती. गुलाब आणि फुलांच्या माळांनी एक्स्प्रेस सजवण्यात आली होती. एक्स्प्रेसच्या महिला बोगीत रंगबिरंगी फुगे लावण्यात आले होते. त्यामुळेच सजवलेल्या एक्स्प्रेससह प्रवाशांना सेल्फी काढण्याचा ‘मोह’ आवरता आला नाही. याआधी डेक्कन क्वीन २०११ साली महिला कर्मचाºयांसह धावली होती, असे रेल्वे विषयातील जाणकार सांगतात. महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, सूचना स्वीकारण्यासाठी सीएसएमटी येथे मदत कक्षाची उभारणी मध्य रेल्वेतर्फे करण्यात आली होती. महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेवर महिलाभिमुख उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १४ वरील विश्रांतिगृहात सॅनिटरी नॅपकिन पॅड वेडिंग मशीन कार्यान्वित करण्यात आली. त्याच बरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे महिलांच्या चेंजिंग रूममध्ये देखील असे वेडिंग मशीन बसवण्यात आले. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हणून तृष्णा जोशी आणि गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी गुरुवारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची धुरा सांभाळली. सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा! सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर संपूर्ण महिला कर्मचा-यांसह डेक्कन क्वीन गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना झाली. यावेळी रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाºयांसह प्रवाशांनीदेखील स्थानकावर गर्दी केली होती. रेल्वेच्या महिला कर्मचाºयांनी सीएसएमटी स्थानकातील सुरेखा यादव यांना ‘गुडी’ची प्रतिकृती देत सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. अशी धावली क्वीन लोको पायलट : सुरेखा यादव सहा. लोको पायलट : तृष्णा जोशी गार्ड : श्वेता गोणे तिकीट तपासनीस : एस. पी. राजहंस, शांती बाला, गीता कुरूप, मेधा पवार रेल्वे सुरक्षा बल : कविता साहू, स्मृती सिंग, ज्योती सिंग, पिंकी सिंग, सरिता सिंग इलेक्ट्रॉनिक अभियंता : योगिता राणे

संबंधित

ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप
Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 
केंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर, ७८ दिवसांचा बोनस जाहीर 
भुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल
रेल्वेची नव्हे , प्रवाशांची सोय आधी पाहा!

महाराष्ट्र कडून आणखी

‘इंडस्ट्री लिंकेज’मध्ये माघारताहेत महाविद्यालये; विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा अनुभव कधी मिळणार ?
अल्पसंख्यांक आयोगाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या; आराफत शेख
नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्हा बँका सरकार ताब्यात घेणार
... गणरायालाही जेव्हा वाजू लागते थंडी
नववर्षात वीज महागणार; प्रति युनिट ६ पैसे वाढ

आणखी वाचा