एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:11 AM2018-07-20T04:11:24+5:302018-07-20T04:12:43+5:30

झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत निकष ठरविण्यात आलेले आहेत. असे असतानाही घरकूल हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली जातात.

To file an FIR against bogus beneficiaries of SRA | एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार

एसआरएच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार

Next

नागपूर : झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत निकष ठरविण्यात आलेले आहेत. असे असतानाही घरकूल हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली जातात. अशी बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. पुणे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी लक्षवेधी मांडली होती.
बोगस कागदपत्रे सादर करून घरकू ल बळकावण्याच्या प्रकारामुळे पात्र लाभार्थीवर अन्याय होतो. अशा प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या लाभार्थीला शपथपत्र द्यावे लागते. अनेकदा यात चुकीची माहिती दिली जाते. अशा लोक ांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. संबंधित संस्थांनी योजनेचे पात्र व अपात्र लाभार्थींची यादी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती वायकर यांनी दिली.
वायकर म्हणाले, पुणे येथील औध येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे लाभार्थी निश्चित करण्याचे काम शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. यासाठी २५ हजार लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. आजवर फक्त १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Web Title: To file an FIR against bogus beneficiaries of SRA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.