मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:38 AM2018-03-24T00:38:04+5:302018-03-24T00:38:04+5:30

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एका शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिनगारे असे या शेतक-याचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत.

Farmer's suicide attempt at the entrance to the ministry | मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एका शेतकºयाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिनगारे असे या शेतक-याचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत.
धर्मा पाटील या वृद्ध शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना शुक्रवारी दीडच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलाब मारुती शिनगारे या ५७ वर्षीय शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासन हादरून गेले. मंत्रालय सुरक्षा कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले आणि मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले.

काय आहे प्रकरण?
गुलाब शिनगारे हे माजलगाव (जि. बीड) येथील रहिवासी आहेत. तिथल्या काही राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे घर पाडून टाकले. तसेच त्यांच्या घराची जागाही ताब्यात घेतली. या अन्यायाविरोधात शिनगारे यांनी स्थानिक स्तरावर दाद मागितली. मात्र तेथे प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपले गाºहाणे मंत्रालयात येऊन मांडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी ते मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करत असता सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिनगारेंनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Web Title: Farmer's suicide attempt at the entrance to the ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.