भंडारा - प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग डहाके यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई वडील, भाऊ, असा आप्त परिवार आहे. अविवाहित असलेले डॉ.पराग यांनी आहार पोषण या विषयावर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी येथे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 

त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१५ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या परागच्या निधनाने भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे,