‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:45 PM2019-06-29T12:45:58+5:302019-06-29T12:56:21+5:30

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत ही प्रक्रिया  राबविली जाणार आहे. 

Entry process for agriculture started from today: 10 July till date to fill the online application | ‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत 

‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत 

Next
ठळक मुद्देएकूण ११ हजार ७३० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार तांत्रिक अडचणींमुळे सीईटी सेलने पूर्वीचे वेळापत्रक केले रद्द

पुणे : राज्यातील कृषी महाविद्यालयांतील कृषी पदवी अभ्यासक्रमांंतील प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि. २९) सुरू होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत ही प्रक्रिया  राबविली जाणार आहे. 
राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्स्यविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची जबाबदारी कृषी परिषदेकडे देण्यात आली आहे. एकूण ११ हजार ७३० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे सीईटी सेलने पूर्वीचे वेळापत्रक रद्द केले आहे. त्यानंतर शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शनिवारपासून (दि. २९) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. 
कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व अर्ज सादर करण्यासाठी दि. १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. १५ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. १६ ते २० जुलैदरम्यान ऑनलाईन हरकती घेतल्यानंतर दि. २६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 
प्रवेशप्रक्रियेअंतर्गत एकूण चार नियमित फेऱ्या होणार 
आहेत. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया कृषी परिषदेच्या संकेतस्थळावरच होणार आहे. त्यानंतर गुणवत्तानिहाय स्पॉट राऊंड घेतला जाणार आहे. या फेरीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तानिहाय प्रवेश मिळेल. त्यानंतर संस्थास्तरावरील कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. ही प्रक्रिया ७ सप्टेंबरपर्यंत चालणार असली तरी दि. १९ आॅगस्ट रोजी अध्यापनाला सुरुवात होणार आहे.
......
कृषी पदवी वेळापत्रक 
दि.२९ जून ते १० जुलै : कागदपत्रे अपलोड 
करणे, अर्ज सादर करणे
दि . १५ जुलै : तात्पुरती 
गुणवत्ता यादी
दि. १६ ते २० जुलै : 
ऑनलाईन हरकती
दि . २६ जुलै : अंतिम 
गुणवत्ता यादी
दि . २८ जुलै : पहिल्या 
प्रवेश फेरीची निवड यादी
दि ३० जुलै ते २ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घेणे, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे
दि ३ ऑगस्ट : रिक्त जागा 
प्रसिद्ध करणे
दि ६ ऑगस्ट : दुसऱ्या 
प्रवेश फेरीची निवड यादी
दि   ७ ते ९ ऑगस्ट : 
.......
संबंधित संस्थेत प्रवेश घेणे
दि  १० ऑगस्ट : 
रिक्त जागा प्रसिद्ध करणे
दि  १२ ऑगस्ट : तिसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी
दि . १३, १४ व १६ ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घणे
दि . १७ ऑगस्ट : 
रिक्त जागा प्रसिद्ध करणे
दि . १९ ऑगस्ट : 
चौथ्या प्रवेश फेरीची निवड यादी
दि. २० ते २२ ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घेणे
दि . २० ते २३ ऑगस्ट : चारही फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत 
मूळ कागदपत्रे व 
शुल्क भरून प्रवेश 
निश्चित करणे
दि. २४ ऑगस्ट : ‘स्पॉट 
राऊंड’ प्रवेशासाठी 
..............
रिक्त जागा प्रसिद्ध करणे
दि . २६ ते २९ ऑगस्ट : स्पॉट राऊंड प्रवेशप्रक्रिया
दि. २९ ऑगस्ट : रिक्त जागा प्रसिद्ध करणे
दि . ३० व ३१ ऑगस्ट : संस्थानिहाय कोटा 
प्रवेशासाठी अर्ज करणे
दि.२ सप्टेंबर : संस्थेतील गुणवत्ता यादी प्रसिद्ध
दि. ३ ते ५ सप्टेंबर : 
संस्थेत प्रवेश घेणे
दि . ६ व ७ सप्टेंबर : रिक्त जागांनुसार गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

Web Title: Entry process for agriculture started from today: 10 July till date to fill the online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.