राष्ट्र उभारणीसाठी अभियांत्रिकी शिक्षण : प्रा. डॉ. मंगेश तु. कराड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-14T07:00:15+5:30

अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन बदल होत असताना त्याच धर्तीवर अभियांत्रिकी शिक्षणाच्या पद्धती आणि अभ्यासक्रमातही बदल होणे आवश्यक आहे.

Engineering Education for nation building: Pro. Dr. Mangesh t. Karad | राष्ट्र उभारणीसाठी अभियांत्रिकी शिक्षण : प्रा. डॉ. मंगेश तु. कराड

राष्ट्र उभारणीसाठी अभियांत्रिकी शिक्षण : प्रा. डॉ. मंगेश तु. कराड

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यकारी अध्यक्ष, एमआयटी, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात आणि शिक्षण पद्धतीत बदल करावा

पुणे  :- अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारे आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन बदल होत असताना त्याच धर्तीवर अभियांत्रिकी शिक्षणाच्या पद्धती आणि अभ्यासक्रमातही बदल होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात सर्वांगिण विकास करणाऱ्या घटकांवरही भर दिला जावा. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात आणि शिक्षण पद्धतीत बदल करावा. इंजिनीअरिंग म्हणजे काय, किती विद्याशाखांतून हे शिक्षण घेता येते? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख....

मेकॅनिकल इंजिनीअरिंग
यामध्ये यंत्र व यंत्रप्रणाली चालवण्यासाठी औष्णिक व यांत्रिक ऊजेर्चा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणं व त्याचं विश्लेषण करणं या गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातले अभियंते सर्व प्रकारच्या यंत्राची रचना, चाचणी, निर्मिती व ती कार्यरत करण्याचं काम करतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं क्षेत्र पुढील दोन प्रकारांत विभागलेले दिसते. १. यंत्रे, यंत्रांची रचना (मेकॅनिझम), साहित्य (मटेरिअल्स), जलशक्ती (हायड्रॉलिक्स) व हवेची शक्ती (न्यूमॅटिक्स), २. कार्य व ऊर्जा, उष्णता, वायुविजन (व्हेंटिलेशन) व वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) यातूनच मेकॅनिकलमधील विविध उपशाखांचा उगम होतो.

एरोनॉटीकल व एरोस्पेस इंजिनीअरिंग :- 
एरोनॉटिक्समध्ये विमाने व अन्य हवेत चालणाºया वाहनांची रचना व निर्मितीचा अभ्यास केला जातो. यामध्ये एरोडायनॅमिक्स, स्ट्रक्चर डिझाइन, प्रोपल्शन इंजिन, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आदी विषयांचा समावेश होतो. एरोस्पेस इंजिनीअरिंगचा एरोनॉटिक्सशी जवळचा संबंध आहे. परंतु एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये अवकाशयाने, रॉकेट सायन्स, कृत्रिम उपग्रह यांच्या अभ्यासाचा समावेश असतो.


मरिन इंजिनीअरिंग :-
मरिन इंजिनीअरिंग ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विशेष शाखा आहे. यामध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल प्रणालीचा वापर करून जहाज चालवण्याचे तंत्र तसेच जहाजावरील विविध यांत्रिक व विद्युत उपकरणांच्या रचनेचा अभ्यास, त्याची देखभाल यांचा समावेश असतो. सागरमाला प्रोजक्ट आणि इतर प्रोजक्टमध्ये रोजगारांच्या अनंत संधी आहेत.

सिव्हिल इंजिनीअरिंग :-
सिव्हिल इंजिनीअरिंगचा उपयोग अनेक क्षेत्रांत पाहायला मिळते. इमारतींचे निर्माण, रस्ते, पूल, कालवे, रेल्वेमार्ग, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, पाणी वाहून नेण्यासाठी वापरले जाणार बोगदे अथवा पाइपलाइन्स, धरण, जलसिंचन, बंदरे, बोगदे व अन्य मोठी बांधकामे यांचा समावेश होतो. स्थापत्य अभियंत्याला सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्येच कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग या विषयाचा अभ्यास केला जातो. यात स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगकडून आखणी करून दिल्याप्रमाणे बांधकाम कसे करावे याविषयीचे अभ्यास केले जाते.

ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग  :-
केंद्र सरकारकडून रस्ते, पूल, ओव्हर ब्रीज, रेल्वे पूल यासरख्या अन्य ट्रान्सपोर्टेशनशी संबंधीत कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. या शाखेमध्ये अनेक आव्हाने आहेत. द्रुतगती मार्ग, फ्री वेचे निर्मिती, विविध प्रकारचे पूल, रेल्वेमागार्चे निर्मिती, वाहतूक नियोजन आणि रस्ते नियमन यासारख्या गोष्टीचा अभ्यास या शाखेत केला जातो.

एन्व्हायर्मेंटल इंजिनीअरिंग :-
बांधकाम करतानाच आगप्रतिबंधक उपाययोजना, परिसंस्थेची रचना, बांधकाम, देखरेख यांचाही समावेश होतो. मनुष्याच्या आरोग्यविषयक गरजा पुरवण्यासाठी अभियांत्रिकी, पाण्याच्या साठ्यांचे नियोजन, विकास व देखभाल हे हायड्रॉलिक इंजिनीअरिंगअंतर्गत येते. पाण्याचे नियोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन व प्रक्रिया इत्यादीचाही या शाखेत समावेश होतो. जिओटेक्निकल इंजिनीअरिंग- या शाखेमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे काम चालणार आहे, त्या ठिकाणच्या भूगभार्तील मटेरिअल्सच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. मायनिंग इंजिनीअरिंगचा अभ्यास याच शाखेत केला जातो.
मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग :- 
अभियांत्रिकीची ही नवीन शाखा आहे. यामध्ये इलेक्ट्रिसिटी, आॅटोमेशन, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रोमॅग्नॅटिझमच्या अभ्यासाचा व उपयोगाचा समावेश केला जातो. इलेक्ट्रिकल पॉवर (विद्युत शक्ती) व सिग्नल्स (संदेश)चा वापर केल्या जाणाºया प्रणालींची व उपकरणांची रचना, उत्पादन, उपयोजन व विकास करणारी ही शाखा आहे.इलेक्ट्रॉनिक्स या विद्याशाखेमध्ये माहितीवर प्रक्रिया करणे व ती वहन करण्यासाठी वापरल्या जाणाºया उपकरणांची, सर्किट्सची रचना करणे, त्यामध्ये संशोधन करणे यासंबंधी अभ्यास केला जातो. नविन विकसित होणाºया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंडस्ट्री आॅटोमेशन, आयओटी, आॅटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एमबेडेड सिस्टीम, व्हीएलएसआय डिझाइन आणि कम्युनिकेशन इंजिनिअरींग हयांची मुख्यत: जास्त चर्चा होताना आढळते. आॅटोमोबाइल इंडस्ट्री सध्या स्थितीत ३० ते ५० टक्के डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर अवलंबून असून इलेक्ट्रीकल व्हेहिकलमध्ये याचे प्रमाण ७० ते ८० टक्केवर जाणे अनिवार्यच दिसते. संबंधित सेन्सरी डिव्हाइसेस आणि प्रोसेसर इंडस्ट्रिजला प्रचंड मागणी भविष्यात असणार आहे. म्हणजे या क्षेत्रात भरपूर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

कम्युनिकेशन व कंट्रोल इंजिनीअरिंग :-
ही शाखा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनच्या सर्व पैलूंशी संबंधित आहे. यामध्ये अभियंते विविध नियंत्रण व्यवस्थेवर काम करतात. उदा. दूरध्वनी केंद्रे, उद्वहन (लिफ्ट)च्या प्रणाली, अवकाशयानाला त्याच्या कक्षेत ठेवण्याचे कार्य इत्यादी कंट्रोल सिस्टीमचा वापर, विमानात, जहाजामध्ये, स्वयंचलित उत्पादन यंत्रणेसाठी व रोबोटिक्समध्ये याचा विशेषत्वाने उपयोग केला जातो.

* विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध लक्षात घेऊन अभ्यासक्रम निवडावा आणि सुवर्ण भविष्य घडवावे. रोजगाराभिमूखता कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि उद्योग कारखाने इतर ठिकाणी इंटर्नशीप करून अनुभव घेतल्यास त्यांची रोजगार क्षमता नक्कीच उंचावली जाईल.

Web Title: Engineering Education for nation building: Pro. Dr. Mangesh t. Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.