ऊसावरील हुमणीचा प्रादूर्भाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 07:44 PM2018-12-17T19:44:46+5:302018-12-17T19:49:00+5:30

राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून वाढत चाललेल्या ऊसावर त्यावर योग्य उपाय योजना केल्या जात नाहीत.

The effect of humani disease on sugarcane will increase | ऊसावरील हुमणीचा प्रादूर्भाव वाढणार

ऊसावरील हुमणीचा प्रादूर्भाव वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देकारखानदार, शेतक-यांना एकत्रित लढा द्यावा लागणारपुढील वर्षी ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर कमी अधिक प्रमाण

पुणे: ऊसावर हुमणी किडीचा प्रादूर्भाव वाढत चालला असून राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून त्यावर योग्य उपाय योजना केल्या जात नाहीत.त्यामुळे यंदा सुमारे १५ टक्के क्षेत्र हुमणी किडीमुळे प्रभावित झाले.परंतु,पुढील वर्षी त्यात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे साखर कारखान्यांना व शेतक-यांना हुमणीचा एकत्रितपणे सामना करावा लागणार आहे.
राज्यातील शेतक-यांकडून नगदी पिक म्हणून ऊसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.दरवर्षी ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.परंतु,त्यामुळे शेतीचा पोत बिघडत चालला आहे.त्यातच ऊसावर विविध किडीचा व रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. हुमणी किडी बरोबरच ऊसावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव होताना दिसत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील नऊ जिल्ह्यातील ६१ हजार ५१० हेक्टर ऊस क्षेत्रावर हुमणीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात २९ हजार ५३९ हेक्टर,अहमदनगरमध्ये १३ हजार हेक्टर,औरंगाबादमध्ये १ हजार ८६२ हेक्टर, बीड जिल्ह्यात १ हजार ४११ हेक्टर ,पुणे जिल्ह्यात ८ हजार ८८ हेक्टर ,कोल्हापूरात ६४२,सांगलीत ३ हजार ४०० हेक्टर ,जालना जिल्ह्यात १ हजार ६९ हेक्टर ,सातारा जिल्ह्यात २ हजार ४९९ हेक्टरचा समावेश आहे. 
राज्यातील काही साखर कारखान्यांनी हुमणी किड नियंत्रणासाठी प्रयत्न केले.काही सारख कारखानदारांनी हुमणी कीडीचे भुंगेरे ३०० ते ३५० रुपये किलोने विकत घेतले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने विशेष प्रयत्न केले. तर जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने हुमणी किड नियंत्रणासाठी शेतक-यांमार्फत भुंगेरे गोळा करून नष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील छत्रपती शाहू साखर कारखान्याने सुध्दा हुमणीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना केल्या.परंतु,हुमणी किडी समुळ नष्ट करण्यासाठी सर्व शेतक-यांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत.
सर्वसाधारणपणे पहिला वळवाचा पाऊस झाल्यानंतर सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास हुमणी किडीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात.त्याचवेळी त्यांना गोळा करून नष्ट केले तरच हुमणीवर नियंत्रण आणने शक्य आहे. यंदा १५ टक्के क्षेत्रावर हुमणीचा प्रादूर्भाव दिसून येत असून त्याचा ऊसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पुढील वर्षी ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर कमी अधिक प्रमाणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अ शी शक्यता वसंतदादा शुगर इस्टिट्यूटमधील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The effect of humani disease on sugarcane will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.