Education Minister Vinod Tawde is a false and mischief leader in the ministry of education | मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश बंदीचा दावा खोटा व अप्रचार करणारा : शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई: मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नाहीत. तसेच कोणत्याही शिक्षकाला मंत्रालयात प्रवेश देऊ नयेत, अशा सूचनाही कोणत्याही यंत्रणेला दिलेल्या नाहीत. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजही आपली मंत्रालयात भेट घेतली, त्यामुळे  मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तर्फे करण्यात आलेला दावा हा पूर्णपणे खोटा चुकीचा व दिशाभूल करणारा आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश नाकारल्याचा दावा  टीडीएफचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे. याबाबत तावडे यांनी सांगितले की, शिक्षकांना मंत्रालयात कोणत्याही प्रकारची प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. राज्यातील नागरिक आपल्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने मंत्रालयात येत असतात. परंतु काहीजण आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात आत्महत्येची धमकी देऊन मंत्रालयीन व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारची सूचना मंत्रालयीन सुरक्षा कार्यालयाकडून मिळाल्यानंतर अशा ठराविक व्यक्तिंना प्रवेश देताना पोलिस यंत्रणा दक्षता घेते, त्याच्याशी शिक्षण खात्याचा संबंध नाही, असेही तावडे यांनी नमूद केले आहे. 


Web Title: Education Minister Vinod Tawde is a false and mischief leader in the ministry of education
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.