‘अविश्वासा’च्या धास्तीने महिला सरपंचाने घेतले विष, रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:55 AM2017-11-12T00:55:28+5:302017-11-12T00:56:15+5:30

दोन दिवसांत आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे, असे कळताच वडगाव जंगल (ता. यवतमाळ) येथील महिला सरपंचाने शनिवारी सकाळी विषप्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Due to 'unbelief', the female sarpancha poison, continued treatment in the hospital | ‘अविश्वासा’च्या धास्तीने महिला सरपंचाने घेतले विष, रुग्णालयात उपचार सुरू

‘अविश्वासा’च्या धास्तीने महिला सरपंचाने घेतले विष, रुग्णालयात उपचार सुरू

Next

यवतमाळ : दोन दिवसांत आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे, असे कळताच वडगाव जंगल (ता. यवतमाळ) येथील महिला सरपंचाने शनिवारी सकाळी विषप्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शीतल सेवक गेडाम असे या सरपंचाचे नाव आहे. एकंदर ९ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत उपसरपंच देवेंद्र कटनकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पोटे, पोलीस पाटील रुपेश सावरकर, विलास ढोबळे यांनी ६ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांची भेट घेऊन सरपंचाविरुद्ध तक्रार केली. तसेच सरपंच कामांमध्ये सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना मांडली. त्यावर तहसीलदारांनी १३ नोव्हेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव मांडण्याबाबतचे पत्र जारी केले. ही माहिती मिळताच शीतल गेडाम यांनी भीतीने शनिवारी सकाळी विष घेतले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Due to 'unbelief', the female sarpancha poison, continued treatment in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.