एसटी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, खासगी वाहनांकडून पिळवणूक, ऐन दिवाळीत चाकरमानी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:55 AM2017-10-20T03:55:41+5:302017-10-20T03:55:44+5:30

ऐन दिवाळीतच एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यातच संप आणि सिझनचा फायदा घेत अनेक ठिकाणी खासगी वाहतुकदारांकडून अडवणूक करण्यात येत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

 Due to the ST strike, the huge number of passenger traffic, theft by private vehicles, and the Diwali of Chakarmani Haraan | एसटी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, खासगी वाहनांकडून पिळवणूक, ऐन दिवाळीत चाकरमानी हैराण

एसटी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, खासगी वाहनांकडून पिळवणूक, ऐन दिवाळीत चाकरमानी हैराण

Next

मुंबई : ऐन दिवाळीतच एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यातच संप आणि सिझनचा फायदा घेत अनेक ठिकाणी खासगी वाहतुकदारांकडून अडवणूक करण्यात येत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी पुकारलेला संप गुरुवारी तिस-या दिवशीही सुरूच राहिला. राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा गेली ७२ तास ठप्प आहे. लक्ष्मीपूजनाचा सण असल्याने गुरुवारी त्यामानाने प्रवाशांची संख्या कमी होती़ त्यामुळे खासगी बसचालकांचेही दर दोन दिवसांच्या तुलनेत कमी होते़
जळगावात आंदोलनामध्ये सहभागी झालेले बसचालक देवीदास सुकलाल सपकाळे (५२) चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तिथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आल्याची माहिती मिळाली. धुळे विभागात तीन दिवसांत महामंडळाला तब्बल २ कोटी ७० लाख रूपयांचा फटका बसला आहे़ यात १२ हजार ९०० फेºया रद्द करण्यात आल्या.
फलक फाडला
कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा फलक कामगारांनी फाडला; तर विविध कामगार संघटनांनी प्रशासनाने संपक-यांवर होणा-या कायदेशीर कारवाईबाबत काढलेल्या परिपत्रकांची होळी केली. विविध कामगार संघटनांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या संपाला पाठिंबा जाहीर केला.
तहसीलदार बनले कंट्रोलर
अहमदनगर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्यवाही सुरू केली असून, पर्यायी व्यवस्था म्हणून ३५ स्कूल बस जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुरूवारी दिवसभर नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकात तहसीलदार सुधीर पाटील कंट्रोलरच्या केबिनमध्ये बसून वाहतुकीचे नियोजन करीत होते.
शिवसेना कामगार संघटनेत फूट
 पुणे जिल्ह्यातील भोर एसटी डेपोत शिवसेनाप्रणीत कामगार सेनेच्या काही कर्मचाºयांनी पोलीस बंदोबस्तात एसटी गाड्या काढून वाहतूक सुरू केली. यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपात फूट पडली आहे.
दिवाळी सुटीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक पंढरीत दाखल होतात; मात्र एसटी संपामुळे पंढरपुरात येणाºया भाविकांची संख्या यंदा कमी आहे. दिवाळीच्या अमावस्येला हुलजंती (ता़ मंगळवेढा) येथे बिरोबा-महालिंगराया हा गुरू-शिष्य भेट सोहळा असतो़ हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातून लाखो भाविक हुजलंतीला येतात़ एसटीची सुविधा नसल्याने याही भाविकांनी पंढरीकडे येणे टाळल्याचे दिसून आले. संप असाच सुरू राहिला तर भाऊबीजला प्रवाशांचे अजून हाल होतील़ त्यामुळे संपावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे़

एसटी आंदोलनाबाबत शिवसेनेचे मौन

एरवी सामान्य जनतेची बाजू घेत प्रत्येक मुद्दयावर भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत मात्र मूग गिळून गप्प आहे. परिवहन खाते शिवसेनेच्या दिवाकर रावते यांच्याकडे असल्यानेच सध्या शिवसेनेचा सामान्यांबाबतचा कळवळ्याला तात्पुरता ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.
एसटी कर्मचा-यांनी आपल्या तुटपुंज्या पगारावरून दिवाळीच्या तोंडावरच संपाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे कर्मचा-यांनी महिनाभरापुर्वीच संपाची नोटीस दिली होती. तरीही हालचाल न झाल्याने कर्मचारी संपावर गेले आणि अवघ्या महाराष्ट्रातील बसस्थानकांवर शुुकशुकाट झाला.
सणाच्या निमित्ताने आपापल्या घरी, नातेवाई, आप्तेष्टांकडे निघालेले प्रवासी अडकून पडले. विशेषत: निमशहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना संपाचे चटके बसत असताना शिवसेना नेतृत्वाकडून याबाबत अद्याप कोणतेच भाष्य आले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप या विषयावर कोणतेच भाष्य केले नाही किंवा सामानातून सरकारवर निशाणा साधला नाही.

केंद्रात आणि राज्यातही भाजपासोबत असणा-या शिवसेनेने शेतकरी कर्जमाफी, महागाई, नोटाबंदी ते अंगणवाडी सेविकांचे आंदोलन अशा प्रत्येक छोट्यामोठ्या विषयात सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नावर बोलतच राहू, अशी भूमिका शिवसेनेने वारंवार बोलून दाखवली.
एसटी आंदोलनाबाबत मात्र शिवसेनेने आपल्या या भूमिकेला मुरड घालत
गप्प राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. एरवी प्रत्येक आंदोलकांची मागणी रास्त असल्याचे सांगत सरकारविरोधात
तातडीने प्रतिक्रीया देणारे उद्धव ठाकरे एसटी कर्मचा-यांच्या मागण्या आणि प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत मात्र मौनच बाळगून आहेत.

अवघ्या ३३ एसटी

राज्यात गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २२ हजार फेºयांपैकी ३३ एसटी बस स्थानकाबाहेर पडल्या. या एसटी रायगड, नाशिक, पुणे, औरंगाबाद या विभागातील या एसटी आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Web Title:  Due to the ST strike, the huge number of passenger traffic, theft by private vehicles, and the Diwali of Chakarmani Haraan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.