स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:10 PM2017-08-14T15:10:23+5:302017-08-14T15:12:33+5:30

सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Drought has increased ten times in 70 years after Independence: Dr. Rajendra Singh | स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

Next
ठळक मुद्देनदीला प्रदूषित करणाºयांवर गुन्हे दाखल कराविकासाच्या नावाखाली विनाश होतोयनमामी चंद्रभागा जलसाक्षरतेचे सोलापूरात स्वागत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नदीला दूषित करणाºयांवर मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल केले जात नाही़ राज्यकर्त्यांनी नदी प्रदूषण, शोषण, अतिक्रमणाकडे लक्ष दिले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला, पूराखाली जाणारी जमीन आठ पटींने वाढली. विकासाच्या नावाखाली विनाश झाला. त्यामुळे नद्यांना वाचवण्याची लोक चळवळ महत्वाची असल्याचे जलतज्ञ डॉ़ राजेंद्रसिंह यांनी सांगितले़
'जलबिरादरी ' आयोजित आणि अर्थ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या  'नमामी चंद्रभागा 'जलसाक्षरता यात्रेचे सोलापूर विद्यापीठ येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
भीमाशंकर - पंढरपूर -वीजापूर मार्गावर ही यात्रा ६ आॅगस्टपासून चालू आहे. ही यात्रा सोमवारी सकाळी सोलापूर येथे पोहोचली. तेथे ' विद्यार्थी -नदी संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार यांनी डॉ. राजेंद्रसिंह यांचा सत्कार केला. व्यासपीठावर कुलसचिव पी. प्रभाकर, सुनील जोशी, उपेंद्र ठक्कर होते.
यात्रेचे समन्वयक नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, किशोर धारिया, अनिल पाटील  प्रभाकर बांदेकर, शैलेंद्र पटेल, वन विभागाचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. 
यावेळी जलसंरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली. पर्जन्य चक्रानुसार पीक चक्र बदलण्याच्या संशोधनाचे काम सोलापूर विद्यापीठाच्या विदयार्थ्यांनी करावे़, असे आवाहन  डॉ. राजेद्रसिंह यांनी केले़ त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पी. प्रभाकर यांनी आभार मानले. टी.आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन  केले.

Web Title: Drought has increased ten times in 70 years after Independence: Dr. Rajendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.