डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडनमधील वास्तू लिलावात

By Admin | Published: September 12, 2014 02:46 AM2014-09-12T02:46:32+5:302014-09-12T02:46:32+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये लंडनमधील ज्या घरामध्ये राहिले त्याचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar's London Vatu Auction | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडनमधील वास्तू लिलावात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडनमधील वास्तू लिलावात

googlenewsNext

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये लंडनमधील ज्या घरामध्ये राहिले त्याचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे.
या लिलावात राज्य शासनाने भाग घ्यावा आणि ते विकत घेऊन तेथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी रोहयो आणि जलसंवर्धन मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. लिलावामध्ये हे घर खरेदी करण्यासाठी राज्य शासनाला ४० कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी तत्त्वत: मान्य केली आहे. मुख्य सचिवांकडे प्रस्ताव दिला. लवकरच त्याला मंजुरी दिली जाईल. विशेष म्हणजे, या घराच्या लिलावाची जी जाहिरात तेथील वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे, त्यात या घरामध्ये भारतातील सामाजिक लढ्याचे अध्वर्यू डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत असत, असे नमूद केले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's London Vatu Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.