dr amol kolhe speech on jijau birth anniversary and chhatrapati shivaji maharaj | प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल- अमोल कोल्हे
प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल- अमोल कोल्हे

सिंदखेडराजा: आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा. प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल, असं अभिनेते आणि शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटलं. राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर भाष्य केलं. जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हव्यात. कारण प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल, असं कोल्हे म्हणाले. प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याचाही सल्ला दिला. 

जिजाऊंच्या जन्मोत्सव कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. 'या मालिकेत लवकरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. हा सोहळा रायगडावर चित्रित केला जावा, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी खासदार संभाजी राजे यांच्याशी संवाद साधला आहे. आता महाराजांची इच्छा असेल, तर राज्याभिषेकाचा सोहळा नक्कीच रायगडावर चित्रित होईल,' असंदेखील कोल्हे यांनी म्हटलं. 
 


Web Title: dr amol kolhe speech on jijau birth anniversary and chhatrapati shivaji maharaj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.