Exclusive: मुख्यमंत्री व्हायचा विचार आहे का?; गिरीश महाजन म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:44 PM2019-03-30T13:44:53+5:302019-03-30T14:30:51+5:30

मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं स्मार्ट उत्तर

dont have ambition to becoming chief minister says bjp minister girish mahajan | Exclusive: मुख्यमंत्री व्हायचा विचार आहे का?; गिरीश महाजन म्हणतात...

Exclusive: मुख्यमंत्री व्हायचा विचार आहे का?; गिरीश महाजन म्हणतात...

googlenewsNext

मुंबई: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. सरकारविरोधात निघालेल्या मोर्च्यांना, आंदोलनांना सामोरं जाऊन यशस्वी शिष्टाई करण्याची कामगिरी महाजन यांनी अनेकदा पार पाडली आहे. आंदोलकांच्या समस्या ऐकून समेट घडवण्याचं काम महाजन यांनी यशस्वीपणे केलं आहे. मुख्यमंत्र्यांना मदत करताना कधी स्वत:च मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का, असा प्रश्न महाजन यांना लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये विचारण्यात आला. राजकीय पेचात टाकणाऱ्या या प्रश्नाला सरकारचे संकटमोचक महाजन यांनी खुबीनं उत्तर दिलं. 

'तुम्ही सरकारविरोधातील मोर्च्यांना सामोरे जातात. अनेकदा त्यांच्यासोबत रस्त्यावरुन चालतात. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी तुमची ओळख आहे. आपण मुख्यमंत्री व्हावं, असा विचार कधी डोक्यात आला का?', असा प्रश्न लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये महाजन यांना विचारला गेला. त्यावर 'मी माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत आहे. माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. असा विचार कधीच माझ्या मनात आलेला नाही,' असं उत्तर महाजन यांनी दिलं.
 



भाजपाचं सरकार आल्यानंतर मोर्चे, आंदोलनं यांचं प्रमाण वाढलं. त्याचं कारण काय, असा प्रश्न विचारल्यावर महाजन यांनी लोकांच्या अपेक्षा वाढल्याचं सांगितलं. यासोबतच मुख्यमंत्र्यांचंही कौतुक केलं. 'लोकांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील आहेत. ते प्रश्न समजून घेतात. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात,' असं महाजन म्हणाले. 

Web Title: dont have ambition to becoming chief minister says bjp minister girish mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.