सत्तेत राहून विरोधी भूमिका नको! - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:09 AM2017-10-17T04:09:52+5:302017-10-17T04:10:16+5:30

राजकीय मतभेद असू शकतात. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून हे वाद मिटविले पाहिजेत. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेना सतत नकारात्मक भूमिका घेते, हा प्रकार अनाठायी आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

 Do not play anti-role role in power! - Ramdas Athavale | सत्तेत राहून विरोधी भूमिका नको! - रामदास आठवले

सत्तेत राहून विरोधी भूमिका नको! - रामदास आठवले

Next

चंद्रपूर : राजकीय मतभेद असू शकतात. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून हे वाद मिटविले पाहिजेत. मात्र, सत्तेत राहूनही शिवसेना सतत नकारात्मक भूमिका घेते, हा प्रकार अनाठायी आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
चंद्रपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आयोजित ६१व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त सोमवारी रामदास आठवले शहरात आले होते. स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सरकार पडण्याचा प्रश्नच नाही. कारण, शिवसेना पाठिंबा काढू शकत नाही. परंतु, सत्तेत राहून विरोधाची भूमिका घेणे चुकीचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आणि भीमसेना एकत्र येण्याची संकल्पना मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अस्मिता कायम ठेवून आम्ही भाजपाशी मैत्री केली. सत्तेत सहभागी झालो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मायावतींनी नेतृत्व करावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले राजकारण करण्यासाठी मायावती यांनी रिपब्लिकन पार्टीचे नेतृत्व करावे. आम्ही तयार आहोत, असा दावाही रामदास आठवले यांना पत्रकार परिषदेत केला.

Web Title:  Do not play anti-role role in power! - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.