अफवांवर विश्वास ठेवू नका, १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 01:44 PM2018-01-08T13:44:33+5:302018-01-08T13:48:29+5:30

मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

Do not believe in rumors 'Maharashtra is not closed' on January 10 | अफवांवर विश्वास ठेवू नका, १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नाही

अफवांवर विश्वास ठेवू नका, १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नाही

Next
ठळक मुद्देमराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेकोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे

मुंबई - मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे कुठलाही बंद नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनी करण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असं समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितलं आहे. 

१ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला. तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचं नुकसान केलं गेलं आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून 'महाराष्ट्र बंद'बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही असं विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितलं आहे. 

मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा दलित वाद लावू पाहणा-यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.. मराठा समाजाला उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढून मराठ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न हानून पाडावा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेच आहे. हिंसाचारापेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेच आहे, तसेच कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आलेले आहे. मराठा क्रांति मोर्चा व सकल मराठा समाजाचे नाव वापरून कोणी बनावट पोस्ट टाकत असेल तर ग्रुपवर मेसेज टाकणा-याला फोन करून जाब विचारावा असे पुढे म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये, अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे..

Web Title: Do not believe in rumors 'Maharashtra is not closed' on January 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.