नांदेडमध्ये काँग्रेसची दिवाळी! अशोक चव्हाण यांनी गड राखला : शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:43 AM2017-10-13T04:43:48+5:302017-10-13T04:47:37+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे.

Diwali of Congress in Nanded Ashok Chavan retained the fort: Shiv Sena, NCP, MIM Bhuiyan Pata | नांदेडमध्ये काँग्रेसची दिवाळी! अशोक चव्हाण यांनी गड राखला : शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम भुईसपाट

नांदेडमध्ये काँग्रेसची दिवाळी! अशोक चव्हाण यांनी गड राखला : शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम भुईसपाट

नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे. देशभरातील मोदी लाट नांदेडमध्ये रोखत भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएमसारख्या पक्षांचे अक्षरश: पानिपात केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. भाजपा सहा तर शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
फडणवीस सरकारमधील भाजपाच्या आठ मंत्र्यांनी नांदेडमध्ये तळ ठोकला होता, तर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या टप्प्यात सभा घेऊन जोरदार टीकास्त्र सोडले होते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्टÑवादीचे नगरसेवक पक्षात घेऊन भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे या निवडणुकीविषयी उत्सुकता लागून होती.
काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्याने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच चुरशीचे वातावरण होते़ मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे भाजपाच्या प्रचाराची सूत्रे होती. शिवाय, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपासोबत गेल्याने प्रचाराला कलाटणी मिळाली. दुसरीकडे, एमआयएम या निवडणुकीत बसपासोबत युती करून रिंगणात उतरले होते. मुस्लीम बहुल भागात एमआयएमचे खा. असदोद्दीन ओवेसी यांनी तब्बल आठ दिवस तळ ठोकला होता. चुरशीच्या प्रचारामुळे या वेळी मतदानाचा टक्काही वाढल्याचे दिसून आले़ यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली़
गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने लागला. एमआयएमचा प्रभाव असलेल्या या प्रभागातून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले़ निकालाचा हा ट्रेंड शेवटपर्यंत कायम होता़ निकालात काँग्रेसची होत असलेली एकतर्फी सरशी पाहिल्यानंतर इतर पक्षांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रापासून काढता पाय घेतला़ विशेष
म्हणजे, दुपारपर्यंत भाजपा-सेना आणि एमआयएमचे खातेही उघडले नव्हते़ सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती़ एमआयएमसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेवटपर्यंत खाते उघडले नाही. निवडणूक निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला़
काँग्रेसच्या दिग्गजांचा दिमाखदार विजय
काँग्रेसच्या विद्यमान महापौर शैलजा स्वामी आणि त्यांचे पतीराज किशोर स्वामी या दोघांनाही विजय मिळाला़ सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभापती अनुजा तेहरा यांचे पती अमित तेहरा, माजी महापौर अब्दुल सत्तार, बलवंतसिंग गाडीवाले, माजी उपमहापौर उमेश पवळे, शमीम अब्दुुल्ला, माजी महापौरांच्या पत्नी कांताबाई मुथा, आनंद चव्हाण, माजी सभापती उमेशसिंह चव्हाण, विनय गिरडे पाटील या दिग्गजांनी महापालिका निवडणुकीत यश मिळविले आहे़
फोडाफोडीच्या राजकारणाला विराम - चव्हाण
नांदेड महापालिकेतील निर्विवाद यशानंतर आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले
की, या निवडणुकीत भाजपाचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. भाजपाने निवडणुकीसाठी आक्रमक प्रचार मोहीम राबविली. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभाही घेतली.
पक्षाचे बडे नेते अनेक दिवस नांदेडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, नांदेडकर त्यांच्या भपकेबाज प्रचाराला बळी पडले नाहीत. Þमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांना भुलले नाहीत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणावर उमेदवार आयात केले होते. मात्र, फोडाफोडी करून भाजपामध्ये आणलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला विराम मिळेल.
काँग्रेस पक्षासाठी हे खूप मोठे यश आहे. मुख्य म्हणजे नांदेडमधील हे निकाल महाराष्ट्रातून आणि देशातून भाजपाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात ठरेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

या पक्षांच्या हाती पडला भोपळा-
मागील निवडणुकीत १४पैकी ११ जागा जिंकत एमआयएम पक्षाने खळबळ उडवून दिली होती़ मात्र अवघ्या पाच वर्षांत नांदेडकरांनी एमआयएमला हद्दपार केल्याचे दिसून आले़ एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्या मातोश्रींचाही या निवडणुकीत पराभव झाला़ या निवडणुकीत
३२ जागांवर उमेदवार दिलेल्या एमआयएमला खातेही उघडताआले नाही़ अशीच विदारक परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली़ राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५७ उमेदवार रिंगणात उतरविले होते़ मात्र या सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्याही हाती भोपळाच मिळाला.
काँग्रेसने आधीचा पराभव विसरू नये : खा. काकडे
नांदेडमधील विजयासाठी अशोक चव्हाण यांचे अभिनंदन. परंतु, या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या ४वरून ६ झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील १० महापालिका, जिल्हा परिषदा व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्याचे विसरू नये, असा टोला भाजपाचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी लगावला आहे.
भाजपाला सोशल मीडियाचा धसका-
सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने २०१४ साली अपप्रचाराची राळ उडवली होती. आता लोकांना खरी परिस्थिती समजू लागली आहे. सोशल मीडियातूनच लोक आता भाजपाचा खोटेपणा उघड करत आहेत. त्यामुळे भाजपाने सोशल मीडियाचा धसका घेतला आहे. या विजयात सोशल मीडियाचा वाटा मोठा असल्याचेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
भाजपाचा परतीचा प्रवास
सुरू - अशोक चव्हाण

भाजपाने चालविलेले फोडाफोडीचे राजकारण, भपकेबाज आणि खोट्या प्रचाराला लोकांनी नाकारल्याचे नांदेड महापालिकेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक आणि आता महापालिकेतील काँग्रेसचा विजय म्हणजे महाराष्ट्रातून भाजपा परतीच्या प्रवासाला निघाल्याचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांची रणनीती फसली
आयात केलेले नेते, एका निवृत्त सनदी अधिकाºयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणा राबविली. त्यामुळे मूळ भाजपाचे आणि संघाचे कार्यकर्ते दुखावले होते. त्यांचाही रोष निकालातून व्यक्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांची रणनीती फसल्याचे खा. चव्हाण म्हणाले.

Web Title: Diwali of Congress in Nanded Ashok Chavan retained the fort: Shiv Sena, NCP, MIM Bhuiyan Pata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.