मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:53 PM2019-04-09T19:53:31+5:302019-04-09T20:03:48+5:30

पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.

divert of progress point by Modi: Ajit Pawar | मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

googlenewsNext
ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रचारात कुटुंबावर टिकागुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी विकासाच्या मुद्यांवर बोलत होते.मात्र,आता देशासह महाराष्ट्रात निवडणूक काळात घेतल्या जात असलेल्या प्रचारसभांमध्ये गांधी आणि पवार कुटुंबावर बोलत आहेत.पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या मुद्याला बगल दिली जात आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पवार बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षप्रदिप कंद,काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून बेरोजगारी,महागाई,जीएसटी शेतक-यांचे प्रश्न याबाबत अनेक आश्वासने देण्यात आली होती. वाढलेली महागाई शंभर दिवसात कमी होईल,असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु,गॅस सिलेंडर, पेट्रोलचे दर वाढलेले असून नागरिकांना जीएसटी त्रास होत आहे. नोटबंदीनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होतील, असे भाजपकडून सांगितले जात होते. परंतु,सध्या कुठेही ऑनलाइन व्यवहार होताना दिसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते या मुद्यांवर भाष्य करत नाही.परंतु,सत्ताधा-यांनी या पूर्वी दिलेल्या आश्वानाबाबत मतदार जागृत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा झाली. सभेच्या तंत्रात ठाकरे यांनी बदल केला असून राजकीय नेत्यांनी केलेली पूर्वीची आणि नंतरची वक्तव्य मोठ्या स्किनवर दाखविली जात आहेत. ठाकरे यांनी केलेली टिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलीच लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांना ठाकरे यांच्या सभेवर भाष्य करावे लागले.
-------------
खेड तालुक्यात विमानतळ होऊ शकले नाही.त्यामुळे हजारो बेरोजगारांचा रोजगार गेला.पुणे -नाशिक महामागार्चे काम पूर्ण होऊ शकले नाही.पुणे- अहमदनगर महामार्गावर एकही ट्रोमा सेंटर सुरू झाले नाही,अशी अनेक विकास कामे शिरूर लोकसभा मतदार संघात अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेनेचे ही निवडणूक हातात घेतली आहे.
-डॉ.अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर लोकसभा  

Web Title: divert of progress point by Modi: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.