जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:51 PM2018-06-15T16:51:58+5:302018-06-15T16:51:58+5:30

जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Dhananjay Munde, who conducts Jalgaon incident for Maharashtra's progressive dignity - Dhananjay Munde | जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे

जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे

googlenewsNext

मुंबई : जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजातील दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या अमानवी घटनेनंतर राज्यभरातून संतापाच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

जळगावमध्ये जो प्रकार घडला तो पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. जळगाव जिल्हयातील मातंग सामाजाच्या काही तरुणांवर क्षुल्लक कारणावरुन ज्यापध्दतीने नग्न करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला तो या शाहु,फुले,आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाला काळीमा फासणारा आहे.

 मागील तीन-चार वर्षात महाराष्ट्रात आणि देशात वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटना सरकार पुरस्कृत आहेत की काय किंवा या सरकारमध्ये काहीजणांची अशापध्दतीने जातीवाद करायची हिंमत वाढते आहे. त्यामुळे याला सरकार जबाबदार आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

 जळगावच्या या अमानवी घटनेचा त्यांनी जाहीर निषेध केला असून कुठेतरी आता आपल्या सगळ्या प्रयत्नातूनच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं पुरोगामीत्व जिवंत ठेवावं लागणार आहे. शाहु, फुले, आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र अबाधित रहावा यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केले आहे.

Web Title: Dhananjay Munde, who conducts Jalgaon incident for Maharashtra's progressive dignity - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.