धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:32 AM2019-01-22T11:32:18+5:302019-01-22T12:01:53+5:30

धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असं गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाश्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असं ही त्यांनी म्हटलं आहे.

Dhananjay Munde politics of hacking - Prakash Mahajan | धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन

धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन

googlenewsNext
ठळक मुद्देधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाश्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असे ही त्यांनी म्हटले आहे.गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे

मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. मात्र धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असे ही त्यांनी म्हटले आहे.



गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञानं केला. या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानंच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही त्यानं केला. याबद्दल धनंजय मुंडेंनी आश्चर्य व्यक्त केलं. 'गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी नेहमीच त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. 'गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,' असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

लंडनमध्ये सुरू असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या अमेरिकन सायबर तज्ज्ञानं ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत हॅकिंग झाल्याचा आणि त्याची कल्पना असल्यानंच मुंडेंची हत्या करण्यात आल्याचंही सूजा म्हणाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील निवडणुकांवेळीही ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा त्यानं केला. ग्रॅफाईट आधारित ट्रान्समीटरच्या मदतीनं ईव्हीएम उघडता येऊ शकतं. याच ट्रान्समीटर्सचा वापर 2014 मध्ये करण्यात आला होता, असं सूजा म्हणाला. 

Web Title: Dhananjay Munde politics of hacking - Prakash Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.