विधानसभेसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 04:08 PM2019-05-13T16:08:05+5:302019-05-13T16:10:05+5:30

सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला आणखीन एक मंत्रीपद मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Demand for 10 seats for BJP in Assembly: Ramdas Athavale | विधानसभेसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी : रामदास आठवले

विधानसभेसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी : रामदास आठवले

Next
ठळक मुद्दे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौºयावर- दुष्काळी भागांची केली पाहणी व शेतकºयांशी साधला संवाद- वंचित आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर केली टीका

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच आरपीआय असणार आहे. दहा जागांची मागणी आरपीआयकडून करण्यात आली आहे. सत्ता येण्यापूर्वी व सत्ता आल्यानंतर होणाºया मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला आणखीनच मंत्रीपद मिळेल. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदही मिळेल असा दावा यावेळी आठवले यांनी केला. 

रामदास आठवले हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौºयासाठी आले होते. तत्पूर्वी दुपारी त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, बाबू बनसोडे,  राजरत्न इंगळे, चंद्रकांत वाघमारे, राजू ओहोळ, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्६णाले की, आठवले म्हणतात...वंचित आघाडीसोबत भरकटलेले, अपरिपक्व कार्यकर्ते गेले. बारामतीत कमळासमोर बटण दाबल्यावर घड्याळालाच मतदान गेले. राज ठाकरे यांच्या सभेचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही. वंचित आघाडीत पडतेय फूट, त्यामुळे गेलेले माझ्याकडे परत येतील असे सांगत  दुष्काळी उपाययोजनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़ 



 

Web Title: Demand for 10 seats for BJP in Assembly: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.