राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसेंचाच : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:04 PM2019-04-09T16:04:54+5:302019-04-09T16:08:54+5:30

खडसे याच्यावरील आरोपावरून भाजपची बदनामी होत असल्याची चर्चा भाजप गटात सुरू झाली होती. त्यामुळे खडसे यांना राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला गेला होता. मात्र खडेसेंनी स्वत: राजीनामा दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

Decision resign Eknath Khadsec to Devendra Fadnavis | राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसेंचाच : देवेंद्र फडणवीस

राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसेंचाच : देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई - भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे १९९० पासून खडसे विधानसभेवर निवडून जात आहेत. १९९५ ते १९९९ दरम्यानच्या युतीच्या काळात खडसे अर्थमंत्री व पाटबंधारे मंत्री राहिलेले आहे. राज्यातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांना समजले जाते.  मात्र तेच खडसे भाजपकडून गेल्या दिवसांपासून उपेक्षीत आहेत.

२०१४ मध्ये युतीचे सरकार मध्ये खडसे यांना मिळालेल्या महसूलसह इतर खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिलं, म्हणून अनेकांची झोप उडाली, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलवून दाखवले होते. 

एमआयडीसी घोटाळ्या बरोबर अनेक आरोप एकनाथ खडसेंवर करण्यात आले होते. खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरून विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरवात केली होती. खडसे याच्यावरील आरोपावरून भाजपची बदनामी होत असल्याची चर्चा भाजप गटात सुरू झाली होती. त्यामुळे खडसे यांना राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला गेला होता. मात्र खडेसेंनी स्वत: राजीनामा दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ खडसे आता काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री
एकनाथ खडसे यांच्यावर एमआयडीसी प्रकरणात जेव्हा आरोप झाले, त्यावेळी विरोधकांनी राळ उठवली होती. विरोधकांना खडसे आणि आम्हीही उत्तर दिले. एकनाथ खडसे त्यावेळी मला येऊन भेटले आणि चौकशी करा तोपर्यंत मी राजीनामा देतो, असे स्वत: म्हणाले होते. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. विचारपूर्वक निर्णय घ्या म्हणून मी त्यांना त्यावेळी सांगितले होते, असा खुलासा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केला.

Web Title: Decision resign Eknath Khadsec to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.