The court acquitted a woman who killed a riot victim for the escape | बचावासाठी बलात्काºयाची हत्या करणाºया महिलेची न्यायालयाने केली सुटका  

मुंबई : स्वत:च्या बचावासाठी बलात्काºयाची हत्या करणाºया पीडितेची सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. पीडितेने जाणूनबुजून हत्या केली नसून स्वत:च्या बचावासाठी हे पाऊल उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सजवळ असलेल्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये पीडिता राहते. १३ आॅगस्ट २००९ रोजी बलात्कारी तिच्या झोपडपट्टीत जबरदस्तीने घुसला आणि तिला ओढत गोठ्यात नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने हातातील चाकूने तिच्या पोटात खुपसवण्याचा प्रयत्न केला. तोच चाकू त्याच्याकडून खेचून घेत तिने त्याच्या गळ्यावर वार केला. पीडितेने स्वत:हून पोलीस ठाणे गाठत बलात्काºयाच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. स्वत:च्या बचावासाठी त्याची हत्या केल्याचेही पोलिसांना सांगितले.
परंतु, बलात्काºयाच्या पत्नीने ही हत्या जागेच्या वादातून झाल्याचे न्यायालयाला सांगितले. माझ्या पतीची हत्या विचारपूर्वक करण्यात आली, असे मृत व्यक्तीच्या पत्नीने न्यायालयाला सांगितले.
‘महिलेचा जबाब, परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालावरून पीडितेने स्वत:च्या बचावासाठी हत्या केल्याचे सिद्ध होते. तिच्यावर बलात्कार झाल्याचा व आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याचा पीडितेचा दावा खरा आहे, हे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध होते,’ असे म्हणत न्यायालयाने पीडितेची निर्दोष सुटका केली.


Web Title:  The court acquitted a woman who killed a riot victim for the escape
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.