दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळात समुपदेशन : राज्य मंडळाकडून व्यवस्था, भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 09:08 PM2019-02-12T21:08:42+5:302019-02-12T21:09:59+5:30

दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मोठया ताणतणावाला सामोरे जावे लागते, या ताणतणावाच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Counseling during examinations for SSC and HSC | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळात समुपदेशन : राज्य मंडळाकडून व्यवस्था, भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळात समुपदेशन : राज्य मंडळाकडून व्यवस्था, भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध

Next

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मोठया ताणतणावाला सामोरे जावे लागते, या ताणतणावाच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल. 
                  राज्य मंडळाकडून घेतली जात असलेली बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीमध्ये तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या दरम्यान पार पडणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणावांना सामोरे जावे लागते. यापार्श्वभुमीवर त्यांना आधार देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
                 समुपदेशनाच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, परीक्षेविषयीची भीती दूर करणे आदी मदत या समुपदेशकांकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ७७६७९६०८०४ , ८६६८३९२२३२, ७०६६४७५३६०, ९६१९६४३७३०, ८४५९११२१३३, ७७९६८७४४७४, ९५६१२२०१५२, ८५३०६०८९४७, ७०६६१२८९९५, ७३८७५०१८९२ या क्रमांकांवर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका आदी संदर्भात प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Counseling during examinations for SSC and HSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.