राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 07:45 PM2018-12-06T19:45:45+5:302018-12-06T19:47:43+5:30

अशोक चव्हाण यांची फडणवीसांवर जोरदार टीका

congress state president slams chief minister devendra fadnavis | राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

Next

दर्यापूर (अमरावती) : मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असून, ते राज्यात म्हणून फडणवीस नव्हे,  तर ‘फसवणीस’ म्हणून ओळखले जातात. राज्यातील व देशातील जनतेने त्यांचा हा गोरखधंदा उद्ध्वस्त करीत काँग्रेसला सत्तेत आणावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले. स्थानिक तरुण उत्साही मंडळाच्या मैदानात आयोजित जनसंघर्ष यात्रेदरम्यान जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. 

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाने उद्ध्वस्त झालेल्या व्यापारी व शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे काहीच नाही. भिकारी झालेले भाजप सरकार सर्वसामान्यांना काहीच देऊ शकत नाही. देशात मुली व महिला असुरक्षित असून ‘भाजप भगाओ-बेटी बचाओ’ असा नारा त्यांनी दिला. राज्यातील ८९ हजार शेतकऱ्यांना ३८ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. परंतु, एक वर्ष पूर्ण होऊनही कर्जमाफी देण्यात आली नाही. याआधी काँग्रेसने शेतकऱ्यांकडून कोणताही अर्ज भरून न घेता एका निर्णयाने सरसकट कर्जमाफी दिली होती. तत्पूर्वी, मान्यवरांची मूर्तिजापूर ते उत्साही मंडळाच्या मैदानापर्यंत संविधान बचाव दिंडी काढण्यात आली. यासह युवक काँग्रेसच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅलीसुद्धा काढण्यात आली. दर्यापूर काँग्रेस कमिटीच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

हे शासन केवळ सहा महिन्यांचे- पृथ्वीराज चव्हाण 
भाजपाच्या कार्यकाळात कुठलाही विकास होऊ शकला नाही. त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे हे शासन केवळ सहा महिन्यांचे असून, त्यानंतर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काही दिवस थांबा, त्यांना जनताच धडा शिकवेल, असेही चव्हाण म्हणाले.

दर्यापूर मतदारसंघात दीड आमदार
दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा कारभार एका नव्हे, दीड आमदारांच्या भरवशावर चालतो. यामध्ये अकोट मतदारसंघाच्या आमदारांचा पूर्ण आणि दर्यापूर मतदारसंघाच्या आमदारांचा अर्धा वाटा आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोडले.

 

Web Title: congress state president slams chief minister devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.