काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यातही एकत्र लढण्याच्या तयारीत? प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:37 AM2018-05-06T06:37:39+5:302018-05-06T06:37:39+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांतही आघाडी होणे स्वाभाविक असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस्ोचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले. त्याचाच भाग म्हणून पालघरची जागा काँग्रेसने, तर भंडारा -गोंदियाची जागा राष्ट्रवादीने आघाडीद्वारे करून लढण्याचा निर्णय शरद पवार व राहुल गांधी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Congress-NCP ready to fight together in the future? Praful Patel's signals | काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यातही एकत्र लढण्याच्या तयारीत? प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यातही एकत्र लढण्याच्या तयारीत? प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

Next

भंडारा - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांतही आघाडी होणे स्वाभाविक असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस्ोचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले. त्याचाच भाग म्हणून पालघरची जागा काँग्रेसने, तर भंडारा -गोंदियाची जागा राष्ट्रवादीने आघाडीद्वारे करून लढण्याचा निर्णय शरद पवार व राहुल गांधी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या दोन्ही लोकसभा मतदार संघांत २८ मे रोजी पोटनिवडणूक आहे.
दोन्ही पोटनिवडणुका आघाडी करून लढणार असल्याचे सांगताना, खा. पटेल म्हणाले, ‘आम्ही आपापसात चर्चा करून सर्वसंमतीने उमेदवार ठरवू. उमेदवारांची घोषणा ९ मे रोजी करण्यात येणार येईल. आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार, पलुस विधानसभेची रिक्त जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद निवडणुकीत सहा जागांपैकी तीन-तीन समान जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी निवडणूक लढत आहे.

सरकारविषयी जनतेमध्ये नाराजी

येत्या २८ मे रोजी होणाºया निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून सरकारच्या अपयशाचा आलेख जनतेसमोर मांडणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. कोणताही वर्ग सरकारवर खूश नाही. जमीन अधिग्रहणावर सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्चून ‘भेल’ प्रकल्प आणला. हे आणि अशी अनेक उदाहरणे देऊन, सरकारच्या अपयशाचा फायदा आघाडीला मिळेल, असे पटोले व खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले.

दोन्ही जिल्हे भाजपामुक्त करू

- नाना पटोले यांनी आपल्याला सांगितले की, वर्षाबेन प्रफुल पटेल भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत आपण दोन्ही जिल्हे भाजपमुक्त करू, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
-मात्र राष्ट्रवादीने वर्षाबेन यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या खेपेस राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणूक आपण स्वत: लढविणार असल्याचे पटेल यांनी जाहीर केले.

सुरतच्या ईव्हीएमना विरोध
खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या पोटनिवडणुकीसाठी गुजरातच्या सुरतमधून ईव्हीए मागविण्यात आली असून, त्यास आमचा आक्षेप आहे. ईव्हीएम सुरतहून मागविण्याची आवश्यकता नव्हती. ती तेथून का आणत आहेत, याविषयी आम्हाला शंका असून, ती पुन्हा पाठविण्याची आमची मागणी आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे ती करणार आहोत.

नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याशी झालेली मैत्री दोन्ही जिल्ह्यांतील विकासासाठी लाभदायक ठरेल, असे खा.पटेल म्हणाले. पटोले यांनीही स्वत: आपण आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले.

Web Title: Congress-NCP ready to fight together in the future? Praful Patel's signals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.