मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 05:27 PM2018-06-05T17:27:00+5:302018-06-05T17:27:00+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. 

Congress demanded to file a violation code against Chief Minister | मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी   

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी   

Next

नवी दिल्ली - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. 
पालघर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान झालेल्या गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या  मंगळावारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.  यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली. 
 मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुनील अरोरा यांच्यासह संपूर्ण निवडणूक आयोगाने काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, "पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशांचा गैरवापर करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साम, दाम, दंड भेदाची भाषा वापरली आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटून मुख्यमंत्र्यांची भाषा खरी करून दाखवली. या सर्व गैर प्रकारांबाबत तसेच निवडणूक अधिका-यांच्या पक्षपाती भूमिकेसंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली व कारवाईची मागणी केली."  
तसेच भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा दुप्पट खर्च केला आहे असा आरोप करून साम, दाम, दंड भेदाची भाषा कुटनितीशी जोडणारे कुटील नितीचा वापरही करू शकतात. स्थानिक अधिका-यांवर आमचा विश्वास राहिला नाही त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानेच यात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली यावर शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्व सात मुद्द्यांचे गांभीर्य ओळखून त्यावर उचित कारवाई होईल असे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.  भाजप उमेदवाराने केलेल्या खर्चाचे विवरणपत्र उपलब्ध करून दिले जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले. 
या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, रामकिशन ओझा व पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामोदर शिंगडा यांचे निवडणूक प्रतिनिधी चंद्रकांत दुबे यांचा समावेश होता. 

Web Title: Congress demanded to file a violation code against Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.