उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 11:34pm

उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. लखनौमधील शिरोज हँगआऊटमध्ये लिटररी फेस्टिव्हलमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. लखनौमधील शिरोज हँगआऊटमध्ये लिटररी फेस्टिव्हलमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला मंचावर बोलावताच गोंधळ सुरू झाला. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी "देश का गद्दार" आणि ''कन्हैया मुर्दाबाद"च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.   कार्यक्रमात गोंधळ वाढू लागल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि कन्हैया कुमारच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ माजला. त्यादरम्यान वंदे मातरम् आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्याबरोबरच कन्हैया कुमार परत जा च्या घोषणाही एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.  

संबंधित

बॉसनं दिला 6 रुपयांचा पगार, कर्मचाऱ्याचा फॅक्टरीतच आत्महत्येचा प्रयत्न
मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे!
कोल्ड ड्रिंक्स पितोय हा चायनीज बकरा, परिसरात चर्चेचा विषय 
बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव
रायबरेलीतील रस्त्यांच्या कामाबद्दल सोनिया गांधींनी दिले गडकरींना धन्यवाद

महाराष्ट्र कडून आणखी

शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड
राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग
धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव
एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू
ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप

आणखी वाचा