उमरखेडमध्ये युतीत संभ्रम; तर काँग्रेसला हवय राष्ट्रवादीचं शतप्रतिशत सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 03:07 PM2019-07-18T15:07:53+5:302019-07-18T15:08:34+5:30

शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगिरी करता येणार आहे.

Confusion in BJP-Shivsena for Umarkhed; Congress want 100 percent support from NCP | उमरखेडमध्ये युतीत संभ्रम; तर काँग्रेसला हवय राष्ट्रवादीचं शतप्रतिशत सहकार्य

उमरखेडमध्ये युतीत संभ्रम; तर काँग्रेसला हवय राष्ट्रवादीचं शतप्रतिशत सहकार्य

googlenewsNext

मुंबई - लोकसभेला हिंगोली मतदार संघात आणि विधानसभेला यवळमाळमध्ये असलेल्या उमरखेड मतदार संघातील समीकरणे बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे प्रमुख राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना उमेरखेड विधानसभा मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगिरी करता येणार आहे.

लोकसभेला उमेरखेड मतदार संघातील मतदारांनी शिवसेनाला आघाडी दिली. गेल्या वेळी येथून काँग्रेसला आघाडी मिळाली होती. शिवसेनेला आघाडी मिळाल्याचा परिणाम विधानसभा निवढणुकीत दिसण्याची शक्यता आहे. सध्या हा मतदार संघ भाजपकडे असून राजेंद्र नजरधने हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीने नजरधने यांना दिलासा मिळाला असला तरी, पक्षांतर्गत विरोधकांमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेने या मतदार संघाची मागणी लावून धरल्यास, विद्यमान आमदार नजरधने यांची अडचण होणार आहे. शिवसेनेकडून एका डॉक्टरने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील विद्यमान उमेदवार बदलण्याच्या चर्चा आहेत. केवळ अंतर्गत कलहामुळे भाजपने उमेदवार बदलण्याची तयारी लावल्याचे समजते. त्यामुळे युतीकडून उमेरखेड मतदार संघात काहीही बदल होऊ शकतो असच चित्र आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार विजय खडसे २००९ मध्ये या मतदार संघातून विजय झाले होते. परंतु, २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजप उमेदवार नजरधने यांना छुपी मदत केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथून विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादीची शतप्रतिशत मदत लागणार आहे.

Web Title: Confusion in BJP-Shivsena for Umarkhed; Congress want 100 percent support from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.