महाविद्यालयीन विद्यार्थी बनताहेत ‘विकी डोनर’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:32 AM2018-08-16T05:32:29+5:302018-08-16T08:48:20+5:30

‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली.

College students are 'Wiki Donor' | महाविद्यालयीन विद्यार्थी बनताहेत ‘विकी डोनर’

महाविद्यालयीन विद्यार्थी बनताहेत ‘विकी डोनर’

- मनीषा म्हात्रे
मुंबई - ‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली. असे विकी डोनर त्याच्या गावातही असल्याचा दावा मेजर बाबा करतो. असे अनेक किस्से बाबांच्या चौकशीतून उघड झाले.
स्मशानातील कोळसा आणि फक्त औषधांनीच गर्भलिंग, लिंगबदल, तसेच मूल होण्याचा दावा करणारा मेजर बाबा हरवलेल्यांचाही शोध घेत असल्याचे सांगतो. त्याच्या दरबारातले किस्सेही गंभीर आहेत. मेजर बाबाच्या म्हणण्यानुसार, आयव्हीएफ तंत्रज्ञानाअंतर्गत, टेस्ट ट्यूब बेबी अंतर्गत नागरिकांची फसवणूक होते. हे सांगताना, त्यांनी त्यांच्याच गावातील एका महिलेचे उदाहरण दिले. अशा प्रयोगशाळांना गावातील मुलेच अवघ्या २ ते ३ हजार रुपयांत वीर्य विकत असल्याचा धक्कादायक खुलासा बाबाने केला आहे. त्याच्याकडे येत असलेल्या डॉक्टरांकडून त्याला ही माहिती मिळाली. अशा अनेक वैद्यकीय प्रयोगशाळा नगरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि अन्य ठिकाणी सरासपणे वीर्य खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असल्याचे बाबा सांगतो. त्यामुळे हेदेखील बेकायदेशीर असून, याचाही सखोल तपास होणे गरजेचे आहे.

केस कापणाऱ्यांना सौभाग्य सुख नाही
ब्युटीशियन महिला या केस कापतात. केस हे महिलांचे सौदर्य असते. ते कापून त्या पाप करतात. म्हणून अशा महिलांना सौभाग्य सुख मिळत नाही, त्यामुळे केस कापू नयेत, असा सल्लाही येथे विधीसाठी आलेल्या महिलांना बाबा देतो.

म्हणे ४ दिवसांत घेतला शोध...
निकिता साळुंखे ही मुलगी गावातून हरवली होती. बरीच शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अखेर हताश झालेल्या निकिताच्या कुटुंबीयांनी मेजर बाबाकडे धाव घेतली. ‘माझ्या अनुमानावरून अवघ्या ४ दिवसांत तिचा शोध लागला आणि ती पनवलेमध्ये सापडली,’ असा दावा बाबाने केला आहे.

११ मुलींनंतर १२वा मुलगा माझ्यामुळे झाला...
गावातील एका दाम्पत्याला ११ मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून ते माझ्याकडे आले. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांना १२वा मुलगा माझ्या औषधांमुळे झाला, असा बाबाचा दावा आहे.
...म्हणून ब्लाउजवर करणी
गावातील एका महिलेला मुलगा सासºयाकडून झाला, ही बाब पतीला समजू नये, म्हणून तिच्या ब्लाउजवर करणी केली. त्यामुळे आजपर्यंत ते पतीला समजले नाही.

Web Title: College students are 'Wiki Donor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.