कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:28 AM2019-02-09T05:28:02+5:302019-02-09T05:28:59+5:30

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे इमाने-इतबारे काम केले व निवडून आणले.

Claim from Congress at Kolhapur's Seat | कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा

कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा

Next

- राजा माने
मुंबई : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे इमाने-इतबारे काम केले व निवडून आणले. पण निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपमय वातावरण करायचा प्रयत्न कुणी केला, हे सर्वांनाच माहिती आहे. जे पेरले, तेच उगवते, या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे. पक्षाने जागा आपल्याकडे घ्यावी, आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र बसून उमेदवार ठरवू व निवडून आणू, असा निर्धार आ. सतेज पाटील ऊर्फ बंटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याची मागणी केली आहे. कारण, जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असून आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू शकतो, आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले. आघाडीतील जागा वाटपाच्या स्पर्धेत कोल्हापूरसाठी अद्यापही काँग्रेस 'रेस'मध्येच असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिकांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे ‘बंटी विरुद्ध मुन्ना’ हा संघर्ष टिपेला पोहोण्याची शक्यता आहे.
२०१४मध्ये घेतलेल्या कष्टांचे काय फळ मिळाले, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. याचे पडसाद उमटणारच. पेरतो तेच उगवतो, असे म्हणत त्यांनी नाव न घेता महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

Web Title: Claim from Congress at Kolhapur's Seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.