सीआयडी उपअधीक्षकाची आत्महत्या, बढती न मिळाल्याने नैराश्यातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:03 AM2017-10-20T04:03:37+5:302017-10-20T04:04:01+5:30

सांगली येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

 CID deputy superintendent suicides, acts of frustration due to lack of promotion | सीआयडी उपअधीक्षकाची आत्महत्या, बढती न मिळाल्याने नैराश्यातून कृत्य

सीआयडी उपअधीक्षकाची आत्महत्या, बढती न मिळाल्याने नैराश्यातून कृत्य

Next

सांगली : येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. नोकरीत बढती न मिळाल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सांगली-मिरज रस्त्यावरील देवल कॉम्प्लेक्समधील तिसºया मजल्यावर गडदे हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते सांगली सीआयडी क्राइम ब्रँचकडे उपअधीक्षक म्हणून रुजू झाले होते. तीन दिवसांपासून ते रजेवर होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांनी फ्लॅटच्या गॅलरीत सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. या वेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले झोपेत होती. सकाळी आठच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर त्यांना गडदे गॅलरीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यावर मोठा धक्का बसला.
अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गडदे यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधील सहा गोळ्या होत्या. त्यापैकी चार गोळ्या त्यांनी गादीवरील उशीखाली ठेवल्या होत्या, तर दोन गोळ्या रिव्हॉल्व्हरमध्ये लोड केल्या होत्या. त्यापैकी एक गोळी उडाली, तर दुसरी गोळी रिव्हॉल्व्हरमध्येच अडकून राहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

तीन पानी पत्र

शिस्तबद्ध अधिकारी अशी ओळख असलेल्या महेश गडदे यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानी पत्र लिहिले आहे. त्यातील मजकूर पोलिसांनी उघड केला नसला तरी, सातत्याने ‘साइड पोस्टिंग’मुळे त्यांना नैराश्य आले होते, असे समजते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिले होते. पण त्याची दखल घेतली गेली नाही. या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी या पत्रात म्हटल्याची चर्चा घटनास्थळी होती.

वडील, भाऊही पोलीस खात्यात
महेश गडदे यांचे वडील गिरजप्पा पोलीस खात्यात फौजदार होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ गणेश साहाय्यक पोलीस निरीक्षक असून ते तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

Web Title:  CID deputy superintendent suicides, acts of frustration due to lack of promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.