चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:30 AM2017-12-01T05:30:47+5:302017-12-01T05:31:00+5:30

पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे.

Chitrangadi's Khende Hadarato Pravagami Maharashtra ... | चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

Next


मुंबई : पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे. महिन्याला चार चिमुरड्यांची हत्या करण्यात होत असल्याची गंभीर बाब या अहवालातून समोर येत आहे.
एनसीआरबीने जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, हत्याकांडात महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. देशामध्ये ३० हजार ४५० हत्याकांडानी खळबळ उडवली. यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. यात मन हेलावणारी बाब म्हणजे ६ वर्षाखालील चिमुकल्यांच्या हत्येत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात चिमुरड्यांचा गळा घोटण्यात प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात ९४ चिमुकल्यांची हत्या झाली. यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. कुठेतरी आजही नकोशी म्हणून चिमुरड्यांची जन्मदाते किंवा नातेवाईकच हत्या करत आहेत. तर काही विकृत वासनेच्या बळी ठरत आहेत. कुठेतरी आजही मुलगी वाचवा बाबत जनजागती होणे गरजेचे आहे.
राज्यामध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराचे ४ हजार ८१५ गुन्हे दाखल झाले आहेत. देशामध्ये लहान मुलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे १ लाख ६ हजार ९५८ गुन्हे दाखल आहेत. यात राज्य दुसºया क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेश मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आघाडीवर असून मध्यप्रदेश तिसºया क्रमांकावर आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Chitrangadi's Khende Hadarato Pravagami Maharashtra ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.