कर्जमाफीतील व्याज मागणा-या जिल्हा बँका बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:38 AM2018-02-26T03:38:43+5:302018-02-26T03:38:43+5:30

शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

 Chief Minister's message will be dismissed for the removal of district banks demanding loan waiver | कर्जमाफीतील व्याज मागणा-या जिल्हा बँका बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

कर्जमाफीतील व्याज मागणा-या जिल्हा बँका बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी बँकांनी करावी म्हणून त्यांना राज्य सरकारने वारंवार कळविले होते. असे असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकºयांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्षात अशी वसुली केली तर त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
वेळेत अर्ज न केल्याने राज्य सरकार कर्जमाफी योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिले होते. अशा सर्व वंचित शेतकºयांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हे अर्ज करता येतील.

Web Title:  Chief Minister's message will be dismissed for the removal of district banks demanding loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.