Chief Minister should get Bhayyabhushan Award - Sandeep Deshpande | मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ नव्हे, ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्या- संदीप देशपांडे

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. परप्रांतीयांनी मुंबईच्या वैभवात भर घातली, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

मुंबई- मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. परप्रांतीयांनी मुंबईच्या वैभवात भर घातली, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यावर चांगलीच तोफ डागली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा कोणत्याही भाषेचा नाही, असा सल्लाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
उत्तर भारतीय आणि परप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला. भाषा वादाचा विषय असू शकत नाही. भाषा संपर्काचं माध्यम असून भाषा माणसाला जोडते. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद निर्माण करु नये असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत रहाणारे उत्तर भारतीय मराठी संस्कृतीशी एकरुप झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.