महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:16 AM2019-05-24T05:16:07+5:302019-05-24T05:45:22+5:30

भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे.

The charisma of 'Namo', Goddrenthi Joy | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

Next

- यदु जोशी
भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे. मोदींबद्दल विरोधक गरळ ओकत असले तरी सामान्य माणसांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची आणि विश्वासाची भावना होती ती मतदानात उतरली. मोदी विरोधकांचा पालापाचोळा झाला. मोदी द्वेषावर आधारित विरोधकांचा प्रचार अंगलट आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटची सहा महिने पद्धतशीर मोर्चेबांधणी केली. विरोधक त्या बाबत पार गाफील राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनी भाजपत आणले. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून वावरणाऱ्या नेत्यांना त्यांनी भाजपसोबत आणले. साताराा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढात उमेदवारी देऊन जोखीम पत्करली. तशीच जोखीम त्यांनी नांदेडमध्ये पत्करली. आ. प्रताप पाटील चिखलीकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे घोर विरोधक. त्यांना मैदानात उतरवून मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या पराभवाचा पाया रचला.
शिवसेनेशी युती होईलच असा विश्वास मुख्यमंत्री बाळगून होते आणि ते युतीचे शिल्पकार ठरले. प्रसंगी भाजपकडे २५ जागा घेत शिवसेनेला २३ जागा देत एक पाऊल मागे घेण्याचे राजकीय शहाणपण त्यांनी दाखविले. युतीमुळे मोठ्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. फडणवीस पक्षहिताशी कधीही तडजोड करत नाहीत.ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला राज्यात देदीप्यमान विजय मिळवून देणरा नेता म्हणून फडणवीस यांची नोंद झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी पक्षसंघटना बांधली.भाजपच्या राज्यातील विजयात रा.स्व.संघ परिवाराचा मोठा सहभाग आहेच. मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून संघच भाजपला हरवेल वगैरे कंड्या अपरिपक्व आणि संघ अजिबात न कळणाऱ्यांकडून पिकविल्या जात होत्या. अशांना संघ कळायला वेळच लागेल; अर्थात तो समजून घ्यायचा असेल तरच.
>शिवसेनेला दिली ताकद
दुष्काळ हाताळण्याबाबत विरोधकांची टीकाही मतदारांनी अनाठायी ठरविली. त्या भागात युतीने दमदार यश मिळविले. कर्जमाफी फसवी असल्याची विरोधकांचा आरोपही साफ फेटाळून लावला.प. महाराष्ट्र चंद्रकांत पाटील, उ.महाराष्ट्र गिरीश महाजन, विदर्भ सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा पंकजा मुंडे, संभाजीा निलंगेकर असे मंत्र्यांना भाग वाटून देत मुख्यमंत्रंनी अचृक ु नियोजन केले. शिवसेना उमेदवारांना सगळे बळ मिळेल याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली.शिवसेनेच्या मतदारसंघातही त्यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना कामाला लावले आणि दरदिवशी तेथील आढावा ते घेत होते.

Web Title: The charisma of 'Namo', Goddrenthi Joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.