सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:54 PM2019-05-02T17:54:04+5:302019-05-02T17:54:41+5:30

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे.

CBSE's Class XII exam Result : is the first in Shashank Nag of Panvel | सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला  

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला  

googlenewsNext

पनवेल  - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत  हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातून पहिला आलेला शशांक नाग हा नवीन पनवेल मधील  डीएव्ही शाळेतील विद्यार्थी आहे. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.  

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डानं लवकर परीक्षा घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या 28 दिवसांमध्ये परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण 79.5 टक्के इतकं आहे. 

यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले. 

Web Title: CBSE's Class XII exam Result : is the first in Shashank Nag of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.