बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:16 AM2017-11-03T07:16:33+5:302017-11-03T07:16:45+5:30

राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

CBI inquiry into BT cotton companies; 'Harbicidal Tolerant Jeans' found in Seven Seeds | बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’

बीटी कॉटन कंपन्यांची सीबीआय चौकशी; पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये आढळून आले ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’

Next

मुंबई : राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 
या संदर्भात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने सखोल अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. अहवालानुसार पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आले. हे घटक असलेले बियाणे मोठ्या प्रमाणात विकण्यात आले. त्याला केंद्र व राज्य सरकारची परवानगी नव्हती. मात्र त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.
हर्बिसाईड टॉलरन्स जीन्समुळे
कापसावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आणि त्यामुळे शेतकºयांना किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागला. किटकनाशकांच्या फवारणीमुळे अलिकडे विशेषत: विदर्भात शेतकºयांचा मृत्यू झाला.

सदोष बियाणे वितरित
‘हर्बिसाईड टॉलरन्ट’ हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. बियाण्यांची क्षेत्रीय चाचणी सीईएजी, सीआयसीआर संस्थांच्या देखरेखीखाली महिको मोन्सॅन्टोकडून करण्यात आली. त्यानुसार या पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूरला एफआयआर नोंदविला आहे. तथापि, अशा बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यांत होते. त्यामुळे व्यापक चौकशी होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले असून या प्रकारणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: CBI inquiry into BT cotton companies; 'Harbicidal Tolerant Jeans' found in Seven Seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस