बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 2:30pm

बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर  : बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. फरजान गुलाम मोहम्मद मदारी (वय ७), नर्गीस दिलशाद मदारी (वय ८), सोनी वरकत मदारी (वय ५), ज्योती गुलाम मोहम्मद मदारी (वय ६, सर्व रा. भोगाव) अशी उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची नावे आहेत. बुधवारी दुपारी भोगाव येथील शेती गट नं. १३२ मध्ये वरील चौघां बालकांनी बदाम समजून नजरचुकीने एरंडीच्या बिया खाल्या. त्यामुळे सायंकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने पालकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

संबंधित

आता पुरुषांवरही आली आहे घरगुती कामे करण्याची वेळ
गोदावरीचे पाणी अडविले, तरी मराठवाड्यातील नेते गप्पच
संविधानानेच सरकार चालेल : मुख्यमंत्री
पदाची अपेक्षा नाही, मी ‘किंगमेकर’ बनणार! पंकजा मुंडे यांचा एल्गार
आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म!

महाराष्ट्र कडून आणखी

आता पुरुषांवरही आली आहे घरगुती कामे करण्याची वेळ
गोदावरीचे पाणी अडविले, तरी मराठवाड्यातील नेते गप्पच
संविधानानेच सरकार चालेल : मुख्यमंत्री
पदाची अपेक्षा नाही, मी ‘किंगमेकर’ बनणार! पंकजा मुंडे यांचा एल्गार
आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म!

आणखी वाचा