मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:59 AM2018-03-29T05:59:39+5:302018-03-29T05:59:39+5:30

एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ताटकळत बसण्याची पाळी आली.

‘Busy’ CM keeps Uddhav Thackeray waiting, can’t meet him | मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले

मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले

Next

मुंबई : एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसण्याची पाळी आली. शिवसेना आमदारांच्या विकास निधीसंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार होते. परंतु मुख्यमंत्री विधानसभेच्या कामकाजात अडकून पडल्याने ही भेट होऊ शकली नाही. विधान भवनाजवळील शिवसेनेच्या कार्यालयात दीडएक तास वाट पाहून उद्धव मग ‘मातोश्री’वर परतले.

उद्धव यांनी मध्यंतरी शिवसेना आमदारांच्या विभागवार बैठकी घेतल्या तेव्हा आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये पुरेसा विकास निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यासाठी उद्धव हे आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार होते. सायंकाळी ५.४५ची वेळ भेटीसाठी ठरली होती. त्यानुसार ते मातोश्रीवरून निघाले. पण मुख्यमंत्र्यांना सभागृहात जरा वेळ लागणार असल्याचे कळल्यावर सायंकाळी ७पर्यंत ते विधान भवनाजवळील शिवसेनेच्या ‘शिवालया’त बसून होते. मुख्यमंत्री विधानसभेतच अडकून पडल्याने भेट होऊ शकली नाही. शेवटी कंटाळून उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व भेट न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आपण लवकरच भेटू, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

वाघ-सिंह 2019 मध्येही एकत्र, मुख्यमंत्र्यांकडून युतीचे संकेत. 

2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागून राहिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत. विधानसभात विरोधकांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस युतीबाबत सकारात्मक होते.
'उंदराने पोखरण्याची आम्हाला भीती नाही कारण आम्ही वाघ आणि सिंह एकत्र आहोत. वाटेत उंदीर येतील पण आम्ही त्यांचा निःपात करु आणि 2019 ला ही आम्ही एकत्रित येऊ' असे स्पष्ट संकेतच देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'विरोधी पक्षनेते तुम्ही उत्तम उंदीर पुराण सांगितलं. तुमचं उंदीरपुराण रंजक आणि कल्पक आहे. तुम्ही उत्तम पटकथाकार आहात, यात शंका नाही' असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. 

Web Title: ‘Busy’ CM keeps Uddhav Thackeray waiting, can’t meet him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.