भरधाव ट्रकची एसटीला धडक,  एसटी चालक ठार : पंधरा प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 07:53 PM2017-07-25T19:53:16+5:302017-07-25T19:53:16+5:30

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथील जगबुडी पुलावर भरधाव ट्रकने एसटीला समोरासमोर धडक दिल्याने एसटी चालक जागीच ठार झाला. तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले.

Bus Accident, Driver Death, 15 | भरधाव ट्रकची एसटीला धडक,  एसटी चालक ठार : पंधरा प्रवासी गंभीर जखमी

भरधाव ट्रकची एसटीला धडक,  एसटी चालक ठार : पंधरा प्रवासी गंभीर जखमी

Next

कोल्हापूर, दि. 25 - कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथील जगबुडी पुलावर भरधाव ट्रकने एसटीला समोरासमोर धडक दिल्याने एसटी चालक जागीच ठार झाला. तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले. मृत चालक अर्जुन सदाशिव दुधाणे (वय ४८, रा. वडणगे पाडळी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला.  
अधिक माहिती अशी, कोल्हापूर-पन्हाळा एस. टी. बस (एम. एच. १४ बी. वाय ०७८३) मध्यवर्ती बसस्थानकातून दूपारी तीनच्या सुमारास सुटली. एसटीमध्ये तीस पेक्षा जास्त प्रवासी होते. ती केर्लीजवळील जगबुडी पुलावर येताच पन्हाळ्याकडून कोल्हापूरकडे येणाºया भरधाव ट्रकने (एम. एच. १० झेड-२७५६) समोरुन जोराची धडक दिली. दोन्ही वाहने एकमेकावर धकडकल्याने मोठा आवाज झाला. जोराचा धक्का बसून वाहन-चालकांसह प्रवासी जखमी झाले. ट्रक चालकही जखमी झाला.  

Web Title: Bus Accident, Driver Death, 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.