मालवणात सापडली बंपर तारली, समुद्राच्या लाटांसोबत किनारी : पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 03:24 PM2017-12-10T15:24:38+5:302017-12-10T15:24:58+5:30

कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले.

Bumper tragedy found in Malwani, borders with sea lanes: With crowds, crowds see locality | मालवणात सापडली बंपर तारली, समुद्राच्या लाटांसोबत किनारी : पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी

मालवणात सापडली बंपर तारली, समुद्राच्या लाटांसोबत किनारी : पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी

Next

महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला. 
रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला.  त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.
पर्यटकांसाठी मांदियाळी-
मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. हिवाळी हंगामात सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची किनारपट्टी आहे. त्यामुळे मालवण, आचरा, कुणकेश्वर, भोगवे, निवती, वेंगुर्ले, शिरोडा, आरोंदा आदी महत्वाच्या बिचवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहे.
स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी  मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरली.
बंपर तारली हा ओखीचा परिणाम-
ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या त्यातूनच तारली सारखी मासळी किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींची लगबग-
सिंधुदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, नयनरम्य भोगवे बिच आदी ठिकाणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र, विर्दभ, मराठवाड्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे दाखल होत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठी गर्दी होत आहे.

Web Title: Bumper tragedy found in Malwani, borders with sea lanes: With crowds, crowds see locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.