मुलांची ‘टॉप नॉट’ तर मुलींची ‘स्टायलिश वेणी’, सेलिब्रेटी लूककरिता पंधरा दिवस अगोदरच अपॉइंटमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:15 AM2017-09-19T03:15:00+5:302017-09-19T03:15:02+5:30

गरब्यात सेलिब्रेटींसारखा आकर्षक लूक असावा यासाठी पेहरावाबरोबर तरुणाई मेकअप आणि हेअरस्टाईलबाबत तेवढी जागरुक असते. यंदाच्या गरब्यात तरुणाईचा हेअरस्टाईलमध्ये ट्रेण्डी लूक पाहायला मिळणार आहे. मुले ‘क्वीफ’, ‘टॉप नॉट’ या हेअरस्टाईलला पसंती देत आहेत तर मुलींमध्ये ‘स्टायलीश वेणी’ची क्रेझ आहे.

Boys' top notch, girls' 'stylish winnings'', 15 days before celebrity look appointment | मुलांची ‘टॉप नॉट’ तर मुलींची ‘स्टायलिश वेणी’, सेलिब्रेटी लूककरिता पंधरा दिवस अगोदरच अपॉइंटमेंट

मुलांची ‘टॉप नॉट’ तर मुलींची ‘स्टायलिश वेणी’, सेलिब्रेटी लूककरिता पंधरा दिवस अगोदरच अपॉइंटमेंट

Next

प्रज्ञा म्हात्रे।
ठाणे : गरब्यात सेलिब्रेटींसारखा आकर्षक लूक असावा यासाठी पेहरावाबरोबर तरुणाई मेकअप आणि हेअरस्टाईलबाबत तेवढी जागरुक असते. यंदाच्या गरब्यात तरुणाईचा हेअरस्टाईलमध्ये ट्रेण्डी लूक पाहायला मिळणार आहे. मुले ‘क्वीफ’, ‘टॉप नॉट’ या हेअरस्टाईलला पसंती देत आहेत तर मुलींमध्ये ‘स्टायलीश वेणी’ची क्रेझ आहे. या हेअरस्टाईलसाठी पार्लर्समध्ये १५ दिवस आधीच बुकिंग केल्याचे हेअर स्टायलीस्ट सांगतात.
गरब्याच्या दिवसात कपडे, मेकअप, दागिने याच्याबरोबरच हेअरस्टाईलवरही भर दिला जातो. यंदा सेलिब्रेटींना कॉपी करण्याकडे तरुण-तरुणींचा कल असल्याचे हेअरस्टायलिस्ट रुशील मोरे याने सांगितले. ‘क्वीफ’, ‘शॉर्ट स्पायकी’, ‘टॉप नॉट’, ‘अंडर हेअरकट’ या हेअरस्टाईलची मुलांमध्ये चलती आहे. त्यातल्या त्यात ‘क्वीफ’ आणि ‘टॉप नॉट’ला प्रचंड मागणी आहे. ‘क्वीफ’ हेअरस्टाईलमध्ये मीडियम शॉर्ट हेअरकट ठेवले जातात. टाळूच्या भागावरच्या केसांचा पफ काढला जातो. बाऊन्सी इफेक्ट या भागातील केसांना दिला जातो आणि बाजूचे
केस शॉर्ट केले जातात. ‘शॉर्ट स्पायकी’मध्ये बाजूने लहान केस करुन टाळूच्या भागात लहान केस स्पाईक सारखे ठेवले जाते. ‘टॉपनॉट’मध्ये टाळुच्या भागावरचे केस तेवढे मोठे ठेवून त्या केसांचे नॉट बांधले जातात आणि बाजूने लहान केस ठेवले जातात.
मुलींमध्ये स्टायलिश वेणीची क्रेझ आहे. यात ‘फ्रेंच ब्रेड’, ‘पिअर्स साईड ब्रेड’, ‘फिश सेल ब्रेड’, ‘डबल पोनीटेन’, ‘बॅक ब्रेड’ या प्रकारांच्या हेअरस्टाईल जास्त चालणार आहेत. मुलींची जास्तीत जास्त पसंती ‘फ्रेंच ब्रेड’ व ‘फिश सेल ब्रेड’ या हेअरस्टाईलला आहे. ‘फ्रेंच ब्रेड’ ही हेअरस्टाईल सागरवेणी सारखी असते. ‘पिअर्स साईड ब्रेड’मध्ये केसांच्या एका बाजूला पिअर्सिंग किंवा कलर एक्स्टेन्शन केले जाते. ‘फिश सेल ब्रेड’मध्ये कानाच्या पाठी सर्व केस एकत्र करुन हेअरस्टाईल केली जाते. केस जास्त दिसावे यासाठी मुली डबल पोनीटेन या हेअरस्टाईलला निवडतात. टाळुवरच्या भागात आणि केसांच्या मागच्या बाजूला पोनीटेन केले जाते. ‘बॅक ब्रेड’मध्ये छोट्या छोट्या वेण्यांच्या सहाय्याने हेअरस्टाईल केली जाते.
या सर्व हेअरस्टाईल वेव्ही किंवा स्ट्रेट केस असलेल्यांसाठी आहे. परंतु ज्यांचे कुरळे केस आहे त्यांच्यासाठी ‘कर्ल्स नॉट’चा पर्याय आहे. टाळुच्या भागावर केसांचे नॉट केले जातात. या हेअरस्टाईलने एक डिसेण्ट लुक मिळतो असे रुशीलने यांगितले.
>मुलांना दाढीही हवी ट्रेण्डी
सध्या युनिफॉर्म बिअर्ड, टॅपर्ड बिअर्ड, थीन बिअर्ड, लाईन्स फॉर डेज, शॉर्ट बिअर्ड विथ मुस्ताच या ट्रेण्डी दाढींची चलती आहे. हेअरस्टाईलबरोबर दाढीलाही वेगळा लूक देण्याकडे तरुणाईचा कल आहे. मुलांनी एक आठवड्याआधी आणि मुलींनी १५ दिवसांआधीच हेअरस्टायलिस्टची वेळ घेतली आहे. या ट्रेण्डी लूकसाठी मुलांनी महिनाभरआधीपासूनच दाढी, केस वाढवायला सुरूवात केली आहे. सेलिब्रेटीसारखे लुक असण्याकडे मुलांचा कल आहे आणि तसाच हुबेहुब लुक देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
- रुशील मोरे, हेअरस्टायलिस्ट

Web Title: Boys' top notch, girls' 'stylish winnings'', 15 days before celebrity look appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.