BJP Government Khotarde - Supriya Sule | भाजपा सरकार खोटारडे - सुप्रिया सुळे

देवळी (वर्धा) : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यवतमाळ ते नागपूर या हल्लाबोल रॅलीचे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाल्यानंतर शिरपूर (होरे) येथे सभा झाली.
मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आदींची उपस्थिती होती. खा. सुळे म्हणाल्या, या सरकारला सत्तेतून घालविणे गरजेचे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून सातबारा कोरा केला होता. परंतु भुलथापा देणाºया या सरकारने शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीचा खेळ मांडला आहे. महिलांनो मोठ्या संख्येने नागपूरला या. आपण सर्व या सरकारवर लाटणे घेऊन हल्लाबोल करू, अशी हाक सुळे यांनी दिली.