समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:43 AM2019-02-03T05:43:17+5:302019-02-03T05:43:33+5:30

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली.

 Bhumi Pujan of Samrudhiyi Highway before the Lok Sabha election code | समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

googlenewsNext

औरंगाबाद  - समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली.

शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी भूमिपूजन होणार असल्याबाबत अजून काही सांगता येणार नाही; परंतु तसेही होऊ शकते. भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. महामार्गाला नाव कुणाचे असेल, यावर त्यांनी बोलणे टाळले. समृद्धी महामार्ग भूसंपादनातून १३६ गावांत होणाऱ्या १२०० हेक्टरसाठी सुमारे ९६४ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून जिल्ह्यात आले, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात १२८९ कोटींचा मोबदला दिल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमतमधील बातम्यांची कात्रणे
शिंदे यांच्या स्वीय सहायकाकडे लोकमतने घाटी रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रकाशित केलेल्या बातम्यांची कात्रणे होती. स्ट्रेचरवरून पडून दगावलेल्या अर्भकाच्या वृत्तापासून ते कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही घाटीत सुविधा मिळत नाहीत. या वृत्तांच्या आधारे अधिष्ठाता आणि जिल्हाधिकाºयांसोबत त्यांनी चर्चा केली.

जिल्हा रुग्णालयाची होणार चौकशी
जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून चौकशी केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title:  Bhumi Pujan of Samrudhiyi Highway before the Lok Sabha election code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.