भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक संयुक्त आघाडी करून लढणार- प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:00 AM2018-04-15T01:00:30+5:302018-04-15T01:00:30+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 Bhandara-Gondiya parliamentary by-elections will be jointly won by Praful Patel | भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक संयुक्त आघाडी करून लढणार- प्रफुल्ल पटेल

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक संयुक्त आघाडी करून लढणार- प्रफुल्ल पटेल

googlenewsNext

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहित
याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यास ही निवडणूक काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेस संयुक्त आघाडी करुन लढणार असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
खा. पटेल म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची जागा पूर्वीपासूनच राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यात बदल
होण्याचा प्रश्न नाही. तसेच निवडणूक आयोगाने येथील निवडणूक
जाहीर केल्यास ती दोन्ही पक्ष आघाडी करुन लढवतील. मात्र यावर आत्तापासूनच तर्क विर्तक लावण्याची गरज नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक झाल्यास आपण स्वत: ती लढविणार नाही हे आपण आधीच स्पष्ट केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष उमेदवार ठरवेल. अद्यापही कोणत्याही उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याचे सांगितले.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. या तिन्ही ठिकाणच्या निवडणुका राष्टÑवादी काँग्रेस लढविणार आहे. या ठिकाणी
राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार उभे
केले जाणार असून त्यादृष्टीने पक्षाचे काम सुरू आहे, असेही पटेल म्हणाले. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी
पाटी आणि बहुजन समाज
पार्टीने एकत्र येऊन लढल्याने भाजपाच्या उमेदवाराचा दारुन
पराभव झाला. त्यामुळे हाच
प्रयोग २०१९ च्या निवडणुकीत केल्यास चित्र वेगळ असू शकते. त्यादृष्टीने सर्व विरोधकांमध्ये वातावरण तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Bhandara-Gondiya parliamentary by-elections will be jointly won by Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.