भंडारा-गोंदिया : ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे. खा. नाना पटोले नाराज असल्यामुळे त्यांनी या निवडणुकीत भाजपाचं काम केलं नाही, असं असतानाही गोंदिया भंडारा जिल्ह्यात भाजपाने मोठी मुसंडी मारत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला चीत केलं आहे. विधानसभा आणि यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीप्रमाणे यावेळेसही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. भंडारा गोंदियात 362 पैकी सुरुवातीला सव्वाशेपेक्षा जास्त सरपंच एकट्या भाजपाचे निवडून आले आहेत.
भाजपाचे भंडारा गोंदिया येथील खा. नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत भाजपाच्या पराभावाचेच प्रयत्न केलेत, पण भंडारा गोंदियातील मतदारांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत भाजपाला पहिली पसंती दिली. गोंदिया विधानसभा मतदारसंघात 56 मधून पहिल्या 14 जागांच्या निकालात भाजपाचे 10 सरपंच निवडणून आले आहेत. तर काँग्रेसला फक्त 2 वर समाधान मानावं लागलं. गोरेगावमध्ये 29 पैकी भाजपानं मुसंडी मातर तब्बल 15 ग्राम पंचायतीमंध्ये सरपंच पदाचे उमेदवार निवडूण आणले. साकोली मध्ये 27 पैकी 18 सरपंच भाजपाचे निवडणून आलेय, तर लाखांदूरमध्ये 22 पैकी तब्बल 15 ग्राम पंचायतीत भाजपाला यश मिळालंय, लाखनीमध्ये 18 पैकी सात, देवरीमध्ये 11 ग्राम पंचायतींवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय.
भंडारा गोंदियात जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश मिळालं, खा. नाना पटोलेंच्या उपद्रव मुल्यांचा भाजपवर कुठलाही परिणाम दिसून आला नसून, मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवत भंडारा – गोंदिया मतदारसंघात भाजपला 65 टक्के ग्राम पंचायतींमध्ये यश मिळालंय.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.