पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 09:14 PM2017-10-20T21:14:19+5:302017-10-20T21:14:35+5:30

एसटी महामंडळातील संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये व विशेषत: उद्याच्या भाऊबीजेला नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बैठक घेण्यात आली

To avoid the inconvenience of passengers by helping the buses of private and private companies | पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार

पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार

googlenewsNext

ठाणे - एसटी महामंडळातील संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये व विशेषत: उद्याच्या भाऊबीजेला नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बैठक घेण्यात आली असून, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी परिवहन महामंडळाचे अधिकारी, पोलीस यांना त्याप्रमाणे सुचना दिल्या आहेत. आठही एसटी बस डेपोत महानगरपालिका, खासगी कंपन्या यांच्याकडून प्रवासी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय सर्व खासगी बसेस, मालवाहू वाहने, शाळांच्या व कंपन्यांच्या बसेस तसेच केडीएमसी, एनएमएमटी,टीएमसी यांच्या बसेस पण उपलब्ध असतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. नवी मुंबई, वाडा, विठ्ठलवाडी, कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे खोपट, वंदना टाकीज, या सर्व ठिकाणी परिवहन अधिकारी, पोलीस, एसटी महामंडळ अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांची पथके नेमली असून, ही पथके प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील.

एनएनएमटीने ७ मार्गांवर १३४ फेऱ्या,ठाणे विभागात १८४ फेऱ्या, कल्याण डोंबिवली बदलापूर विभागात १५१ फेऱ्या, पनवेल विभागात ३०८ फेऱ्या, मुंबई विभागात २३३ फेर्यांचे नियोजन केले आहे. कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने पनवेल, वाशी, बेलापूर, भिवंडी, मलंगगड, वाशी या मार्गांवर ५६ बसेस चालविण्याचे ठरविले असून ३०० फेर्यांचे नियोजन केले आहे. ठाणे पालिकने मीरा रोड,बोरीवली, नालासोपारा, नारपोली,काल्हेर अशा मार्गांवर ८१ बसेस चालविण्याचे ठरविले असून ३८६ फेऱ्या मारण्यात येतील. आनंदनगर आगारातूनही जादा १० बसेस धावतील. 

Web Title: To avoid the inconvenience of passengers by helping the buses of private and private companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.