गोव्यात आरोग्य संचालकांवर केबिनमध्ये हल्ला, संचालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 05:45 PM2018-05-24T17:45:37+5:302018-05-24T17:45:37+5:30

सरकारच्या आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी यांच्यावर आरोग्य खात्यात येऊन लोखंडी सळीने एका खासगी डॉक्टरने हल्ला करण्याची घटना गुरुवारी येथे घडली व आरोग्य खात्यात मोठी खळबळ उडाली.

attacked on Goa Health director | गोव्यात आरोग्य संचालकांवर केबिनमध्ये हल्ला, संचालक जखमी

गोव्यात आरोग्य संचालकांवर केबिनमध्ये हल्ला, संचालक जखमी

Next

पणजी - सरकारच्या आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी यांच्यावर आरोग्य खात्यात येऊन लोखंडी सळीने एका खासगी डॉक्टरने हल्ला करण्याची घटना गुरुवारी येथे घडली व आरोग्य खात्यात मोठी खळबळ उडाली. हल्ल्यात दळवी जखमी झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचारांसाठी नेण्यात आले.

मूळ तामिळनाडूमधील असलेला व्यंकटेश आर हा डॉक्टर मडगाव व काणकोणमध्ये डायलसिस केंद्र चालवत आहे. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळाने त्याला डायलसिस केंद्र आऊटसोर्स केले आहे. गेले काही महिने आरोग्य खाते त्याचे बिल फेडत नाही. सुमारे सत्तर लाख रुपयांचे त्याचे बिल थकले असल्याची चर्चा आरोग्य खात्यात सुरू आहे. त्याला वारंवार आरोग्य खात्याच्या कांपाल येथील कार्यालयात गेले काही महिने खेपा माराव्या लागल्या. यामुळे चिडून हल्लेखोर गुरुवारी कांपाल येथील आरोग्य खात्यात आला व हातात श च घेऊन संचालकाच्या केबिनमध्ये गेला. आत दळवी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर धावपळ उडाली. दळवी याच्या डोक्यावर प्रहार झाल्याने रक्त येऊ लागले. त्यास बांबोळी येथील गोमकॉ इस्पितळात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. जखम गंभीर स्वरुपाची नसल्याने सायंकाळी दळवी यांना इस्पितळातून घरी जाऊ देण्यात आल्याचे सुत्रंनी सांगितले.

आरोग्य खात्याच्या संचालकाच्या केबिनमध्ये येऊन कुणी अशा प्रकारे हल्ला करण्याची घटना गोव्यात प्रथमच घडली आहे. आपली बिले थकविली गेल्याने आपल्याला अशी कृती करावी लागली असे व्यंकटेश आर याने पत्रकारांना सांगितले. तथापि, बिलांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झालेला आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांचे म्हणणो आहे.

आरोग्य मंत्री राणो म्हणाले, की संचालकावर खुनी हल्ला होणो ही गंभीर गोष्ट आहे. हल्लेखोराला पोलिसांनी तुरुंगात टाकायला हवे. बिलांचा विषय न्यायप्रविष्ट आहे. समजा विषय न्यायप्रविष्ट नसला तरी, अशा प्रकारे केबिनमध्ये जाऊन संचालकावर खुनी हल्ला करणो हे निषेधार्हच आहे. संतापजनक अशी ही घटना असून सरकारने या घटनेची दखल घेतलेली आहे.

Web Title: attacked on Goa Health director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.