अटलबिहारी वाजपेयी हे मने जोडणारे नेते - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:41 AM2018-11-20T03:41:33+5:302018-11-20T03:41:58+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचे उद्गाते असलेल्या अटलजींनी आयुष्यभर मने जोडण्याचे अजोड कार्य केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना म्हणाले.

Atal Bihari Vajpayee is the leader of the mind - Devendra Fadnavis | अटलबिहारी वाजपेयी हे मने जोडणारे नेते - देवेंद्र फडणवीस

अटलबिहारी वाजपेयी हे मने जोडणारे नेते - देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचे उद्गाते असलेल्या अटलजींनी आयुष्यभर मने जोडण्याचे अजोड कार्य केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना म्हणाले.
माजी मंत्री आनंदराव देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी विधानसभा सदस्य माधवराव गायकवाड तसेच माजी विधानसभा सदस्य केशवराव पारधी, वासुदेव देशमुख, शिवाजीराव नागवडे, वैजनाथराव आकात, यादवराव भोयर, लक्ष्मणराव जाधव, वसंतराव थोरात, विठ्ठलराव भैलुमे, वसंतराव इटकेलवार आणि विमल रांगणेकर या दिवंगतांनाही सभागृहाने श्रद्धांजली वाहिली.
शोकप्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री
बबनराव लोणीकर, अजित पवार, गणपतराव देशमुख, छगन भुजबळ, अबू आझमी, पंकज भुजबळ,
दीपिका चव्हाण यांनीही भावना व्यक्त केल्या.

Web Title: Atal Bihari Vajpayee is the leader of the mind - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.